सोलापूर ग्रामीणमध्ये 157 नवे कोरोनाबाधित, तिघांचा मृत्यू 

प्रमोद बोडके
Friday, 20 November 2020

तालुकानिहाय बाधित. कंसात मृतांची संख्या 
अक्कलकोट : 1149 (69), बार्शी : 6121 (181), करमाळा : 2101 (51), माढा : 3528 (114), माळशिरस : 6016 (125), मंगळवेढा : 1518 (44), मोहोळ : 1680 (84), उत्तर सोलापूर : 749 (36), पंढरपूर : 6828 (206), सांगोला : 2616 (44), दक्षिण सोलापूर : 1485(50), एकूण : 33791 (1004) 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 3 हजार 555 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 3 हजार 398 अहवाल निगेटिव्ह आले असून 157 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे तीन व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंदही आजच्या अहवालात घेण्यात आली आहे. आज एकाच दिवशी 92 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता 33 हजार 791 झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ग्रामीण भागातील एक हजार चार जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 1 हजार 279 जणांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागातील 31 हजार 508 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत.

आजच्या अहवालामध्ये मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये माळशिरस तालुक्‍यातील सुळेवाडी येथील 60 वर्षिय पुरुष, बार्शी तालुक्‍यातील शेळगाव आर येथील 65 वर्षिय महिला, माळशिरस तालुक्‍यातील तोंडले-बोंडले येथील 65 वर्षिय पुरुष यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील दोन लाख 91 हजार 963 जणांची आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन लाख 91 हजार 910 जणांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आलेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 157 new corona in Solapur rural, three dead