Breaking ! 'अंतिम' परीक्षेसाठी 16 केंद्रे; शहरात व ग्रामीणमधील 'या' केंद्रांवर ऑफलाइन परीक्षा

2SPPU_Students.jpg
2SPPU_Students.jpg

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून 5 ऑक्‍टोबरपासून अंतिम वर्षाची परीक्षा सुरु होणार आहे. त्यात नियमित, एटीकेटी आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. ऑफलाइनची परीक्षा शहरातील तीन केंद्रांवर तर ग्रामीण मधील 16 केंद्रांवर होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शहा यांनी दिली.

ऑफलाइन पद्धतीने परीक्षा केंद्रांवर कोणकोणत्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे, याबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आणि ट्‌विटरवर उपलब्ध असून संबंधित प्राचार्यांकडेही ती माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार ऑफलाइन ऑप्शन निवडलेल्या विद्यार्थ्यांनी त्या-त्या केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, परीक्षेसंदर्भात विद्यापीठाकडे ज्या विद्यार्थ्यांनी संमतीपत्र भरून दिले नाही अथवा ऑफलाईन परीक्षा देण्यास संमती दिली आहे, अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देता येईल. यासाठी अशा विद्यार्थ्यांना www.pahsu.org या पोर्टल वर जाऊन तिथे आपला PRN नंबर टाकून forgot password हा पर्याय निवडायचा आहे. त्यांना मोबाईलवर पासवर्ड प्राप्त होईल. त्यानुसार त्यांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देता येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शहा यांनी दिली.


या परीक्षा केंद्रांवर 'ऑफलाईन'ची सोय
शहरातील विद्यार्थ्यांची सोय संगमेश्‍वर महाविद्यालय, वसुंधरा महाविद्यालय आणि डी.बी. एफ. दयानंद महाविद्यालय येथील केंद्रांवर करण्यात आलेली आहे. तर ग्रामीण भागातील शिवाजी महाविद्यालय बार्शी, सुवर्णलता गांधी महाविद्यालय वैराग, सी बी खेडगी महाविद्यालय अक्कलकोट, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर, सांगोला महाविद्यालय सांगोला, देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय मोहोळ, बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय अनगर, संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा, शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय नातेपुते, के एन भिसे महाविद्यालय कुर्डूवाडी, विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय टेंभुर्णी, मारुतीराव महाडिक महाविद्यालय मोडनिंब, माऊली महाविद्यालय, वडाळा या 16 केंद्रांवर ऑफलाईन विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com