सोलापूर ग्रामीणच्या 1603 चाचण्यांमध्ये आढळले 95 नवे कोरोनाबाधित 

प्रमोद बोडके
Saturday, 31 October 2020

एकूण बाधित, कंसात मृतांची संख्या 
अक्कलकोट : 1073 (67), बार्शी : 5467 (177), करमाळा : 2029 (47), माढा : 3183 (106), माळशिरस : 5373 (107), मंगळवेढा : 1405 (36), मोहोळ : 1524 (78), उत्तर सोलापूर : 726 (35), पंढरपूर : 6141 (180), सांगोला : 2433 (39), दक्षिण सोलापूर : 1418 (45), एकूण : 30772 (917) 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 1 हजार 603 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1 हजार 508 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 95 अहवाल पॉझिटिव्ह आले असून अहवालानुसार सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. एकाच दिवशी 111 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या आता 30 हजार 772 झाली आहे. आतापर्यंत 917 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 2 हजार 420 जण सध्या ऍक्‍टिव्ह कोरोना बाधित रुग्ण असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 27 हजार 435 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

आजच्या अहवालामध्ये मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये मोहोळ तालुक्‍यातील कुरुल येथील 58 वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्‍यातील इसबावी येथील 45 वर्षिय पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील निम्बर्गी येथील 69 वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्‍यातील रोपळे येथील 45 वर्षिय पुरुष, पंढरपुरातील नवीपेठेतील 65 वर्षिय पुरुष, बार्शीमधील रोडगा रस्ता येथील 80 वर्षिय पुरुष यांचा समावेश आहे. कोरोना चाचणीचे अद्यापही 34 अहवाल प्रलंबित आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In 1603 trials of Solapur Grameen found 95 new corona