सोलापूर ग्रामीणमध्ये 188 नवे कोरोना बाधित 

प्रमोद बोडके
Thursday, 29 October 2020

तालुकानिहाय बाधित, कंसात मृतांची संख्या 
अक्कलकोट : 1073 (67), बार्शी : 5442 (176), करमाळा : 2026 (47), माढा : 3143 (106), माळशिरस : 5290 (107), मंगळवेढा : 1394 (35), मोहोळ : 1448 (77), उत्तर सोलापूर : 726 (35), पंढरपूर : 6055 (175), सांगोला : 2418 (37), दक्षिण सोलापूर : 1414 (44) एकूण : 30 हजार 429 (906) 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 2 हजार 810 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2 हजार 622 अहवाल निगेटिव्ह आले असून 188 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे ग्रामीण भागातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. एकाच दिवशी कोरोना मुक्त झालेल्या 161 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता 30 हजार 429 झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 906 जणांचा मृत्यू झाला असून रुग्णालयात सध्या 2 हजार 863 उपचार घेत आहेत. आतापर्यंत 26 हजार 660 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

आज मृत पावलेल्या पाच व्यक्तींमध्ये माळशिरस तालुक्‍यातील श्रीपूर येथील 65 वर्षिय पुरुष, पंढरपूर येथील कवठेकर गल्ली येथील 62 वर्षिय पुरुष, माढा तालुक्‍यातील शिराळ येथील 72 वर्षिय पुरुष, पंढरपूर येथील जुनी माळी गल्ली येथील 58 वर्षीय महिला, सांगोल्यातील सनगर गल्ली येथील 71 वर्षिय पुरुष यांचा समावेश आहे. कोरोना चाचणीचे अद्यापही 49 अहवाल प्रलंबित आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 188 new corona affected in rural Solapur