सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये एकाच दिवशी आढळले 207 कोरोनाबाधित 

संतोष सिरसट 
Tuesday, 4 August 2020

कोरोनाची स्थिती 
आज आलेले अहवाल-1085 
आज निगेटिव्ह अहवाल-878 
आज पॉझिटिव्ह अहवाल-207 
रुग्णालयात उपचार घेत असलेले-1603 
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले-2571 
आज मयत-7 

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज कोरोनाबाधितांचा उच्चांक झाला. पहिल्यांदाच ग्रामीण भागात 207 जण कोरोनाबाधित असल्याचे आज आलेल्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बाधितांची संख्या चार हजार 301 झाली आहे. आज कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 127 एवढी झाली आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. ऍन्टिजेन टेस्ट मोठ्या प्रमाणात घेतल्या जात असल्यामुळे ही संख्या वाढलेली दिसत आहे. आज कुर्डू (ता. माढा) येथील 67 वर्षीय पुरुष, चपळगाव (ता. अक्कलकोट) येथील 65 वर्षीय महिला, आढीव (ता. पंढरपूर) येथील 57 वर्षीय पुरुष, पढरपूर येथील 53 वर्षीय पुरुष, नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील 45 वर्षाची महिला, वैराग येथील 63 वर्षाची महिला तर बार्शी येथील 68 वर्षीय पुरुषाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. 

या गावांमध्ये आढळले कोरोनाबाधित 
अक्कलकोट येथील ए-वन चौक, स्वामी विवेकानंद पार्क प्रत्येकी दोन, चपळगाव, चुंगी प्रत्येकी चार, काझीकणबस, किणी प्रत्येकी पाच, तडवळ येथे एक रुग्ण आढळला. करमाळ्यातील बागवान नगर, कृष्णाजीनगर येथे प्रत्येकी एक, सिद्धार्थनगर, देवीचा माळ येथे प्रत्येकी दोन रुग्ण आढलले. माढ्यातील भांगे गल्लीत तीन, संत सेनानगरात पाच, शिवाजी नगर येथे तीन, अकोलेबुद्रुक येथे एक, मोडनिंब येथे आठ, निमगाव टे, रांझणी येथे प्रत्येकी एक, उपळाई बुद्रुक येथे 23 रुग्ण आढळले. माळशिरस तालुक्‍यात अकलूज येथे तीन, दहिगाव, खंडाळी, माळीनगर येथे प्रत्येकी एक, नातेपुते, सवतगाव येथे प्रत्येकी तीन, वेळापूर, विझोरी प्रत्येकी एक रुग्ण आढळले. मंगळवेढ्यातील शनिवारपेठ, डोंगरगाव, लक्ष्मी दहिवडी येथे प्रत्येकी एक, मरवडे येथे सात रुग्ण आढळले. मोहोळ तालुक्‍यातील औंढी, हराळवाडी, कामती बुद्रुक, कामती खुर्द येथे प्रत्येकी एक, कोरवली येथे आठ, पापरी, पाटकूल, विरवडे येथे प्रत्येकी एक, वडवळ येथे नऊ, वाघोलीवाडी येथे दोन रुग्ण आढळले. उत्तर सोलापूर तालुक्‍यात वडाळा येथे सहा, कळमण येथे दोन रुग्ण आढळले. बार्शी येथील आडवा रस्ता, भिसे प्लॉट, कसबा पेठ येथे प्रत्येकी एक, अलिपूर येथे दोन, लहूजी चौक, पंकज नगर येथे प्रत्येकी तीन, पाटील चाळ, सोलापूर रोड, सुभाषनगर, उपळाई रोड येथे प्रत्येकी एक, वाणी प्लॉट येथे दोन, आगळगाव येथे एक, भोयरे येथे पाच, रातंजन येथे दोन, उंबरगे येथे एक, उपळे दु येथे दोन, वैराग येथे चार रुग्ण आढळले. दक्षिण सोलापूर तालुक्‍यात औराद, मंद्रूप येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. पंढरपुरातील अनिल नगर येथे चार, घोंगडे गल्ली, गोविंदपुरा येथे प्रत्येकी एक, इसबावी येथे दोन, मनीषा नगरात चार, विवेकवर्धिनी शाळेजवळ एक, संभाजी चौक येथे दोन, आंबे येथे एक, भोसे येथे आठ, कासेगाव येथे सात, शिरगाव येथे तीन रुग्ण आढळले. सांगोल्यातील परीट गल्ली, आलेगाव येथे प्रत्येकी एक, महूद येथे तीन, नाझरे येथे एक रुग्ण आढळला. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 207 coronadoids found on the same day in rural areas of Solapur