
तालुकानिहाय बाधित. कंसात मृत्यू संख्या
अक्कलकोट : 1162 (71), बार्शी : 6325 (185), करमाळा : 2241 (53), माढा : 3797 (116), माळशिरस : 6556 (138), मंगळवेढा : 1631 (46), मोहोळ : 1754 (85), उत्तर सोलापूर : 793 (38), पंढरपूर : 7423 (216), सांगोला : 2803 (48), दक्षिण सोलापूर : 1525 (54), एकूण : 36010 (1050)
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 2 हजार 354 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2 हजार 233 अहवाल निगेटिव्ह आले असून 121 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवशी 219 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुळे तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
ग्रामीण भागातील कोरोना चाचणीचे 55 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. सध्या 12 हजार 15 जणांना होम क्वारंटाईन तर तीन हजार 100 जणांना इन्स्टिट्युन्शल क्वारंटाईन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील एकूण बाधितांची संख्या आता 36 हजार 10 झाली आहे. ग्रामीण भागातील 1 हजार 50 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला असून 1 हजार 533 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ग्रामीण भागातील 33 हजार 427 जण आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. आजच्या अहवालामध्ये मृत्यू दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी येथील 75 वर्षिय पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील 72 वर्षीय महिला आणि सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथील 92 वर्षिय महिलेचा समावेश आहे.