सोलापूरच्या ग्रामीण भागात 251 नवे कोरोनाबाधित 

सोलापूरच्या ग्रामीण भागात 251 नवे कोरोनाबाधित 
Updated on

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज दोन हजार 208 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार 957 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 251 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज 222 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज आठ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या अनेक दिवसात पहिल्यांदाच त्यामध्ये केवळ तीन पुरुष तर पाच महिलांचा समावेश आहे. यापूर्वी मृत्यूंमध्ये पुरुषांची संख्या नेहमी जास्त असायची. मात्र, आज पुरुषांपेक्षा महिलांची संख्या मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये जास्त आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या आता 26 हजार 300 एवढी झाली आहे तर आत्तापर्यंत 715 जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. कोरोनाची बाधा झाल्याने अद्यापही पाच हजार 214 जण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. याशिवाय कोरोनामुक्त झाल्याने 20 हजार 371 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 

आज तनाळी शेटफळ (ता. पंढरपूर) येथील 65 वर्षांचे पुरुष, कुरूल (ता. मोहोळ) येथील 65 वर्षाचे पुरुष, सिंदखेड (ता. अक्कलकोट) येथील 80 वर्षाची महिला, माळी गल्ली मंगळवेढ्यातील 68 वर्षाची महिला, वरवडे (ता. माढा) येथील 60 वर्षाची महिला, अकोलेकाटी (ता. उत्तर सोलापूर) येथील 65 वर्षाची महिला, फळवणी (ता. माळशिरस) येथील वर्षाची महिला, वाखरी (ता. पंढरपूर) येथील 60 वर्षाचे पुरुष यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

 Solapur Political News
Milk Rate
Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Marathi News Esakal
www.esakal.com