सोलापूरच्या ग्रामीण भागात आज 255 नवे कोरोनाबाधित 

सोलापूरच्या ग्रामीण भागात आज 255 नवे कोरोनाबाधित 

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज एकूण 255 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज दोन हजार 197 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी दोन हजार 642 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 255 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. याबरोबरच आज पुन्हा एकदा नऊ जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. सलग दुसऱ्या दिवशी नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे आजच्या अहवालावरून स्पष्ट होते. 


आज माळशिरस तालुक्‍यातील मेडद येथील 70 वर्षाचे पुरुष, महर्षी कॉलनी अकलूज येथील 73 वर्षाची महिला, चौंडेश्वरीवाडी येथील 85 वर्षाचे पुरुष, अक्कलकोटच्या नवीन राजवाड्याजवळील 60 वर्षाचे पुरुष, ढेमरेवाडी (ता. बार्शी) येथील येथील 90 वर्षाची महिला, कुर्डूवाडी (ता. माढा) येथील 56 वर्षाची महिला, करमाळ्यातील भवानी पेठेतील 50 वर्षाचे पुरुष, सावडी येथील 72 वर्षाचे पुरुष, किल्ला बाग येथील 67 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 
जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 10 हजार 871 एवढी झाली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 317 एवढी झाली आहे. अद्यापही रुग्णालयात दोन हजार 902 जण कोरोनावर उपचार घेत आहेत. कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी गेलेल्यांची संख्या सात हजार 652 एवढी झाली आहे. 

या गावात आणले नव्याने कोरोना बाधित रुग्ण 
अक्कलकोट तालुक्‍यातील किणीवाडी, सतलापूर, मैंदर्गी, शिवाजीनगर तांडा, बार्शीतील अलीपूर रोड, बारंगुळे गल्ली, बावी, बोरगाव, चुंब, दाणे गल्ली, दत्तनगर, देवगाव, गाडेगाव रोड, गौडगाव, जावळी प्लॉट, कसबा पेठ, कुर्डूवाडी रोड, मिरगणे अपार्टमेंट, नागणे प्लॉट, नळे प्लॉट, उत्तरेश्वर मंदिराजवळ, पानगाव, पिंपळकर प्लॉट, शिवाजी नगर, सोलापूर रोड, सोमवार पेठ, तुळशीराम रोड, उपळे दुमाला, माढ्यातील अकुलगाव, अरणगाव, भोसरे, कुर्डूवाडी, टेंभूर्णी, वडाचीवाडी, वडशिंगे, मोहोळमधील अनगर, एकुरके, पाटकुल, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील नंदुर, पंढरपुरातील अंबाबाई पटांगण, आंबे, भंडीशेगाव, भोसले चौक, बोहाळी, चळे, चिलाईवाडी, दाळे गल्ली, धोंडेवाडी, गोकुळनगर, गोपाळपूर, गोविंदपुरा, इंदिरा गांधी भाजी मार्केट, इसबावी, जुना कराड नाका, कडबे गल्ली, करकंब, कासेगाव, खेड भोसे, किश्‍ते गल्ली, कोर्टी, लिंक रोड, नाथ चौक, ओमकार नगर, पुळूज, संत पेठ, स्टेशन रोड, सुस्ते, उत्पात गल्ली, वाखरी, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील भंडारकवठे, बोरामणी, इंगळगी, माळकवठा, एनटीपीसी, विडी घरकुल, सांगोला तालुक्‍यातील अचकदाणी, कोळा, महूद रोड, परीट गल्ली, तिप्पेहळी, यलमार मंगेवाडी, करमाळ्यातील मंगळवार पेठ, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, बोंडले, बोरगाव, चांदापुरी, दहिगाव, दसूर, गारवाड, गिरवी, गोरडवाडी, गुरसाळे, जाधववाडी, जांभूळ, जानकर प्लॉट, कमल मळा, खुडूस, माळीनगर, मारकडवाडी, मोरोची, नातेपुते, पानीव, पठाण वस्ती, पिंपरी, पुरंदावडे, संग्राम नगर, शंकर नगर, श्रीपूर, सिद्धार्थ नगर, तामशिदवाडी, तरंगफळ, वेळापूर, यशवंनगर, झिंजेवाडी, मेडद या गावांमध्ये आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com