
आरोग्य विभागाची मार्गदर्शक तत्त्वे...
सोलापूर : नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर या वर्गांना शिकविणाऱ्या सर्वच शिक्षकांची कोरोना टेस्ट करणे बंधनकारक केले. त्यात शहरातील सुमारे दोन हजार शिक्षकांपैकी आतापर्यंत एक हजार 574 शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. 'आरटीपीसीआर' व रॅपिड ऍन्टीजेन टेस्टमध्ये एकूण 27 शिक्षकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर दोन शिक्षकेतर कर्मचारीही कोरोना बाधित आढळले आहेत.
कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये भिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे. त्यांना कोरोनाचे उपचार घेतल्यानंतर श्वसन तथा छातीचा त्रास होऊ नये, यासाठी 'पोस्ट कोविड ओपीडी' सुरु करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. त्यानुसार सोलापूर महापालिकेने बॉईज नागरी आरोग्य केंद्रात पोस्ट कोविड ओपीडी सुरु केली आहे. त्याठिकाणी कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांच्या मनातील भिती, त्यांचा मानसिक तणाव दूर करून त्यांच्यावर स्वतंत्र उपचार केले जात आहेत. दरम्यान, शहरातील आणखी पाचशे शिक्षकांची कोरोना टेस्ट झालेली नाही. आज एकूण चारशे शिक्षकांची कोरोना टेस्ट पार पडली. त्यात नऊ शिक्षक पॉझिटिव्ह आढळले असून आणखी 59 जणांचे रिपोर्ट आलेले नाहीत, अशी माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. बिरू दुधभाते यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.
आरोग्य विभागाची मार्गदर्शक तत्त्वे...