esakal | दक्षिण सोलापूरच्या अंत्रोळीत एकाच दिवशी आढळले 28 नवे कोरोना बाधित 

बोलून बातमी शोधा

corona}

410 जणांवर उपचार सुरू 
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या 410 ऍक्‍टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये अक्कलकोट तालुक्‍यातील 17, बार्शी तालुक्‍यातील 35, करमाळा तालुक्‍यातील 55, माढा तालुक्‍यातील 58, माळशिरस तालुक्‍यातील 65, मंगळवेढा तालुक्‍यातील पाच, मोहोळ तालुक्‍यातील 38, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील बारा, पंढरपूर तालुक्‍यातील 54, सांगोला तालुक्‍यातील 20, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील 51 व्यक्तींचा समावेश आहे. 

दक्षिण सोलापूरच्या अंत्रोळीत एकाच दिवशी आढळले 28 नवे कोरोना बाधित 
sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूरच्या ग्रामीण भागात आज कोरोना चाचणीचे 1 हजार 728 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1 हजार 663 अहवाल निगेटिव्ह आले असून 65 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 65 अहवाल पैकी 28 अहवाल दक्षिण सोलापूर तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील आहेत. अंत्रोळी परिसरातील मतिमंद शाळेतील विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. 

ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या आता 40 हजार 332 झाली आहे. त्यातील 38 हजार 745 जण कोरोनामुक्त झाले असून रुग्णालयात सध्या 410 जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे 1 हजार 177 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. आज नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये अक्कलकोट ग्रामीण मधील दोन, बार्शीतील ग्रामीण भागातील एक व नागरी भागातील आठ, करमाळा तालुक्‍यातील नागरी व ग्रामीण भागातील प्रत्येकी एक, माढा तालुक्‍यात ग्रामीण भागातील चार, माळशिरस तालुक्‍याच्या ग्रामीण भागात आठ, मंगळवेढा तालुक्‍याच्या नागरी भागात दोन, मोहोळ तालुक्‍याच्या ग्रामीण भागात एक, पंढरपूर ग्रामीण भागात तीन व नागरी भागात दोन, सांगोला तालुक्‍याच्या ग्रामीण भागात चार रुग्ण आढळले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्‍यात आज एकही नवीन रुग्ण आढळला नाही. ग्रामीण भागात आज नव्याने आढळलेल्या 65 रुग्णांमध्ये 52 रुग्ण हे ग्रामीण भागातील तर 13 रुग्ण हे नागरी भागातील आहेत.