सोलापूर ग्रामीणमध्ये आज 288 नव्याने कोरोनाबाधित; तिघांचा मृत्यू

संतोष सिरसट 
Friday, 14 August 2020

तालुकानिहाय एकूण कोरोनाबाधतांची संख्या
अक्कलकोट-585, बार्शी-1394, करमाळा-303, माढा-480, माळशिरस-559, मंगळवेढा-250, मोहोळ-416, उत्तर सोलापूर-455, पंढरपूर-1577, सांगोला-284, दक्षिण सोलापूर-757, एकूण-7060

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज 288 कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या सात हजार 60 इतकी झाली आहे. त्याचबरोबर आज तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 197 एवढी झाली आहे.

आढीव (ता. पंढरपूर) येथील 65 वर्षीय महिला, वागदरी (ता. अक्कलकोट) येथील 73 वर्षीय पुरुष तर चिखर्डे (ता. बार्शी) येथील 72 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज एकूण दोन हजार 628 जणांची तपासमी करण्यात आली. त्यापैकी दोन हजार 340 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 288 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आज बार्शीतील आडवा रस्ता, अलिपूर रोड, आझाद चौक, भीमनगर, भिसे प्लॉट, चिंचोळी, फुले प्लॉट, गादेगाव रोड, घारी, हांडे प्लॉट, जैनमंदिर, जावळे प्लॉट, कसबा पेठ, खामगाव, लहुजी चौक, लक्ष्मीनगर, पांगरी, रामभाऊ पवार चौक, राऊत गल्ली, सनगर गल्ली, शेळगाव, सोलापूर रोड, तुळजापूर रोड, उपळाई रोड, वैराग, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, पोलिस स्टेशन मागे माळशिरस, बोरगाव, कण्हेर, माळीनगर, निमगाव, श्रीपूर, वेळापूर, यशवंतनगर, शिंघोरणे, पंढरपूर तालुक्‍यातील आढीव, आंबेडकरनगर, अनिल नगर, बादलकोट, फरतळे दिंडीजवळ, गजानन महाराज मठाजवळ, नागपूरकर मठाजवळ, भजनदास चौक, भक्ती मार्ग, भोसे, भुवनेश्‍वरी मठ, डाळे गल्ली, डोंबे गल्ली, गादेगाव, गाताडे प्लॉट, गोपाळपूर, गुरसाळे, हरिदास वेस, इसबावी, जुनी पेठ, कडबेगल्ली, करकंब, करोळे, कासेगाव, कौठाळी, कवठेकर गल्ली, खर्डी, कोळेगल्ली, कुंभार गल्ली, लकेरी गल्ली, लक्ष्मी टाकळी, महापौर चाळ, महावीरनगर, मटन मार्केट, मेंढापूर, मुंढेवाडी, नवीन बागवान मुहल्ला, पंचमुखी मारुती, पुंडलिक नगर, रांझणी, रोपळे, संभाजी चौक, सांगोला रोड, संतपेठ, सरकोली, सावता माळीमठ, शासकीय वसाहत, शिवाजी चौक, सुलेमान चाळ, तुंगत, उमदे गल्ली, उंबरेपागे, वाखरी, विस्थापितनगर, विठ्ठल नगर, अक्कलकोट येथील कडबगाव रेल्वे स्टेशन, कर्जाळ, कुरनूर, वागदरी, करमाळ्यातील फंड गल्ली, गुजर गल्ली, किल्ला वेस, मारवाड गल्ली, सिद्धार्थनगर, माढ्यातील लऊळ, मानेगाव, मंगळवेढ्यातील कुंभारगल्ली, माळीगल्ली, नवीन गल्ली, पाटखळ, शिरनांदगी, तामर्डी, उचेठाण, मोहोळमधील आण्णाभाऊ साठे नगर, डिकसळ, कामती बु तांडा, खवणी, क्रांतीनगर, कुरुल, पाटकूल, सोहाळे, उत्तर सोलापुरातील मार्डी, सांगोल्यातील चिकमहूद, घेरडी, जवळा, खवसपूर, लोनविरे, मेथवडे, नाझरे, सरगरवाडी, दक्षिण सोलापुरातील बोरामणी, दर्गनहळ्ळी, टाकळी, विंचूर या गावांमध्ये आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. अद्यापही रुग्णालयात दोन हजार 769 जणांवर उपचार सुरु आहेत. चार हजार 94 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 138 जणांचे अहवाल येणे अद्यापही बाकी आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 288 newly corona affected in rural Solapur today; Death of three