अक्कलकोट : संपर्कातील 30 जण तपासणीसाठी ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

शहरातील सुभाष गल्ली सभोवतालचा एक किलोमीटर परिसर (कारंजा चौक, तूप चौक, लक्ष्मी मार्केट, ए-वन चौक, मधला मारुती, राम गल्ली, भारत गल्ली, देशमुख गल्ली, सर्जेराव बोळ, आझाद गल्ली, मौलाली गल्ली, राजीवनगर, होटकर गल्ली, माणिक पेठ, जनता चाळ, वीरक्त मठ रस्ता, फुटाणे गल्ली, फत्तेसिंह चौक) प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला. 

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट शहरात वास्तव्यास असलेला व मैंदर्गी रस्त्यालगत औद्योगिक वसाहतीत फरशीचा व्यवसाय करणारा 46 वर्षीय व्यापाऱ्याचा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात 21 मे रोजी मृत्यू झाला होता. त्याचा कोरोना चाचणी अहवाल शुक्रवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन अलर्ट झाले. रुग्णाच्या राहत्या घरापासूनचा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला. तसेच 28 मेपर्यंत जनता कर्फ्यूचे पालन करावे, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी व प्रशासनाने केले. 
हेही वाचा : 

aschim-maharashtra-news/solapur/despite-crisis-they-managed-boost-banana-exports-296963" target="_blank">संकटातही त्यांनी केळी निर्यातीला मिळवले वाढते दर

शहरातील सर्व दुकाने बंद 
रुग्णाच्या मधला मारुती येथील घरापासून सुभाष गल्ली, राम गल्ली, जुना अडत बाजार परिसर सील करण्यात आला आहे. आज मेडिकल, अत्यावश्‍यक व तातडीच्या सेवा वगळता शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. सर्वांनी घरात बसावे, मास्क वापरावे, असे आवाहन नगरपालिकेतर्फे वाहनावरील स्पीकरद्वारे करण्यात येत होते. व्यापाऱ्याच्या परिवारातील सदस्यांसह त्यांच्या संपर्कातील सुमारे 30 जणांना दुपारपर्यंत तपासणीसाठी ताब्यात घेऊन त्यांना अक्कलकोट शहरात क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार मरोड यांनी दिली. त्यांचे स्वॅप तपासण्यात येणार आहेत. 

हेही वाचा : `मनमानी` करणाऱ्या तुकाराम मुंढेंचा इफेक्ट नागपुरात दिसला...कोरोना रोखला!

त्या व्यापाऱ्याचे फरशीचे दुकान 
त्या व्यापाऱ्याचे फरशीचे दुकान मैंदर्गी रस्त्यालगत औद्योगिक वसाहतीत आहे. 28 मेपर्यंत जनता कर्फ्यू असून या कालावधीत सहा मेडिकल दुकाने सुरू असतील, तसेच पाच सुपर बाजार चालू राहणार असून ते फक्त घरपोच सेवा देणार आहेत. तसेच दूध सकाळी सात ते 10 पर्यंत मिळेल, बाजार किंवा कोणतीही दुकाने चालू असणार नाहीत याची नोंद नागरिकांनी घ्यावी व जनता कर्फ्यूचे पालन करावे, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी, तहसीलदार अंजली मरोड, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड व नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आशा राऊत यांनी केले आहे. 

शहरातील उर्वरित भाग बफर क्षेत्र घोषित 
अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील मधला मारुती परिसरात आढळलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरातील एक किलोमीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र, तर उर्वरित बफर क्षेत्र म्हणून आज उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील यांनी घोषित केले. शहरातील सुभाष गल्ली सभोवतालचा एक किलोमीटर परिसर (कारंजा चौक, तूप चौक, लक्ष्मी मार्केट, ए-वन चौक, मधला मारुती, राम गल्ली, भारत गल्ली, देशमुख गल्ली, सर्जेराव बोळ, आझाद गल्ली, मौलाली गल्ली, राजीवनगर, होटकर गल्ली, माणिक पेठ, जनता चाळ, वीरक्त मठ रस्ता, फुटाणे गल्ली, फत्तेसिंह चौक) प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 30 people in contact were detained for Check