सोलापूर ग्रामीणमध्ये 308 नवे कोरोना बाधित, सहा जणांचा मृत्यू 

प्रमोद बोडके
Monday, 31 August 2020

या भागातील व्यक्तींचा झाला मृत्यू 
मोहोळमधील आदर्श चौकातील 57 वर्षिय पुरुष, कुर्डूवाडी जवळील भांबोरे वस्तीतील 63 वर्षिय पुरुष, करमाळा तालुक्‍यातील हिवरे येथील 85 वर्षिय पुरुष, करमाळा तालुक्‍यातील हिसरे येथील 75 वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्‍यातील चळे येथील 68 वर्षिय पुरुष, बार्शीतील धारुळकर बोळ येथील 85 वर्षिय पुरुष अशा सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही आज स्पष्ट झाले आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण व नगरपालिका हद्दीत रविवारी रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत नव्या 308 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही स्पष्ट झाले असून कोरोना मुक्त झालेल्या तीनशे आठ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये अक्कलकोट तालुक्‍यातील हन्नूर, म्हाडा कॉलनी, समर्थ नगर, शिवाजीनगर, माढा तालुक्‍यातील अरण, भोसरे, सिना दारफळ, कसबा पेठ, कुर्डूवाडी, मोडनिंब, तांबवे, तेली गल्ली, मंगळवेढा तालुक्‍यातील असबेवाडी, दत्त वस्ती, दुर्गा माता नगर, गणेशवाडी, गुंगे गल्ली, हिवरगाव, कचरेवाडी, कात्राळ, लक्ष्मी दहिवडी, मुढवी, मोहोळ तालुक्‍यातील अनगर, कुरुल, साठेनगर, सावळेश्वर, येवती, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील तळे हिपरगा या ठिकाणी नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

पंढरपूरमधील अनिल नगर, अनवली, भोसे, बोहाळी, चळे, देगाव, गादेगाव, गजानननगर, गोकुळनगर, गोपाळपूर, इसबावी, करकंब, कुंभार गल्ली, लक्ष्मी नगर, लक्ष्मी टाकळी, लिंकरोड, महाद्वार, महावीर नगर, मेंढापूर, मुंडेवाडी, ओमकार नगर, रोहिदास चौक, संत पेठ, संत रोहिदास चौक, शेंडगेवाडी, शिरढोण, सब जेल, सुस्ते, उमदे गल्ली, विजापूर गल्ली, अचकदाणी येथील रुग्णांचा समावेश आहे. 
सांगोला तालुक्‍यातील आचकदाणी, दत्तनगर, धायटी, कटफळ, कोळा, नाझरे, वासुद रोड, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील इंगळगी, माळकवठा, विडी घरकुल, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, भांबुर्डी, बोंडले, चाकोरे, दहिगाव, जाधव वाडी, मांडकी, मोरोची, नातेपुते, पळसमंडळ, संग्रामनगर, तामणेनगर, तोंडले, वेळापूर, यशवंनगर, बार्शी शहरातील 422, आगळगाव, बावी, भोसले चौक, ब्राह्मण गल्ली, चोरमुले प्लॉट, डावरे गल्ली, देवणे गल्ली, ढगे मळा, धनगर गल्ली, पिंपळगाव धस, गाडेगाव रोड, गोंडील प्लॉट, गोरमाळा, गुळपोळी, इर्लेवाडी, जामगाव रोड, जावळे प्लॉट, जय शंकर मिल, काळेगाव, कासारवाडी रोड, कशपी प्लॉट, कुर्डूवाडी रोड, लोखंड गल्ली, मळेगाव, मंगाडे चाळ, मंगळवार पेठ, मणगिरे मळा, मिरघणे कॉम्प्लेक्‍स, नळे प्लॉट, नारीओ, नेहरूनगर, पंकज नगर, राऊत चाळ, सावरकर चौक, सोमवार पेठ, सुभाषनगर, सुतारनेट, तडवळे उंबरगे, उपळे दुमाला, उपळाई रोड, वैराग, वाणी प्लॉट, व्हनकळस प्लॉट येथील कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे.

करमाळा तालुक्‍यातील देवळाली, घोलप नगर, गुजर गल्ली, कृष्णाजी नगर, कुंभेज, महेंद्र नगर, मेन रोड, निळज, साडेइ शाहूनगर, विट या ठिकाणी आज नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या अकरा हजार 521 झाली असून आजपर्यंत 330 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 3 हजार 77 जणांवर उपचार सुरू आहेत. 8 हजार 114 जण कोरोनामुक्त झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 308 new corona infected, six killed in rural Solapur