सोलापूरच्या ग्रामीण भागात 316 नवे कोरोनाबाधित रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 September 2020

तालुकानिहाय कोरोनाबाधित रुग्ण कंसात मृत्यू 
अक्कलकोट- 1011 (57), बार्शी- 4326 (144), करमाळा- 1783 (37), माढा- 2359 (71), माळशिरस- 3811 (73), मंगळवेढा- 1090 (22), मोहोळ- 984 (47), उत्तर सोलापूर- 672 (29), पंढरपूर- 4593 (112), सांगोला- 1693 (21), दक्षिण सोलापूर- 1239 (32), एकूण- 23561 (645) 

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज दोन हजार 497 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन हजार 181 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 316 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज रुग्णालयातून कोरोनामुक्त होऊन 707 जण घरी सुखरूप परतले आहेत. कोरोनामुळे आज जिल्ह्यातील 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये दहा पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. 
जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत 23 हजार 561 जण कोरोनाबाधित झाले आहेत. कोरोनामुळे 645 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. कोरोना झाल्यामुळे अद्यापही सहा हजार 70 जण वेगवेगळ्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या 16 हजार 846 एवढी आहे. 

आज औज मंद्रूप (ता. तालुका दक्षिण) येथील 55 वर्षाची महिला, खंडाळी (ता. माळशिरस) येथील 71 वर्षाचे पुरुष, टाकळी रोड पंढरपूर येथील 70 वर्षाची महिला, अनगर (ता. मोहोळ) येथील 50 वर्षाचे पुरुष, दहिटणे (ता. बार्शी) येथील 82 वर्षांचे पुरुष, डाळी गल्ली पंढरपूर येथील 72 वर्षाचे पुरुष, कोळगाव (ता. करमाळा) येथील 58 वर्षाचे पुरुष, नातेपुते (ता. माळशिरस) येथील 70 वर्षाचे पुरुष, खैरेवाडी (ता. माढा) येथील 80 वर्षाचे पुरुष, एखतपूर (ता. सांगोला) येथील 75 वर्षांचे पुरुष, कोर्टी (ता. पंढरपूर) येथील 80 वर्षाचे पुरुष, येणकी (ता. मोहोळ) येथील 40 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 316 new coronary artery disease patients in rural areas of Solapur