सोलापूरच्या ग्रामीण भागात आज 337 नवे कोरोनाबाधित 

संतोष सिरसट 
Tuesday, 8 September 2020

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज एकूण तीन हजार 764 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी तीन हजार 427 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 337 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज आठ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 419 एवढी झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत 14 हजार 522 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज एकूण तीन हजार 764 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी तीन हजार 427 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 337 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज आठ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 419 एवढी झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत 14 हजार 522 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज बेंबळे (ता. माढा) येथील 77 वर्षाचे पुरुष, विद्यानगर अक्कलकोट येथील 69 वर्षाची महिला, स्वागत नगर अक्कलकोट येथील 57 वर्षाची महिला, मेडशिंगी (ता. सांगोला) येथील 63 वर्षाचे पुरुष, कासेगाव (ता. पंढरपूर) येथील 40 वर्षाचे पुरुष, कुर्डूवाडी येथील 68 वर्षाची महिला, भाजी मार्केट चौफाळा पंढरपूर येथील 55 वर्षाची महिला तर गोदुताई विडी घरकुल (ता. दक्षिण सोलापूर) येथील 65 वर्षाच्या महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. 

या गावात आढळले नव्याने पूर्ण बाधित रुग्ण 
बार्शीतील ऐनापूर मारुती, अलिपूर रोड, आझाद चौक, भवानी चौक, कॅन्सर हॉस्पिटल, चिखर्डे, डाणे गल्ली, ढगेमळा, धस पिंपळगाव, गौंडगाव, गोंडील प्लॉट, हांडे गल्ली, हातीद, होनराव प्लॉट, लाडोळे, लोखंड गल्ली, भांडेगाव, नागणे फ्लॉट, नाईकवाडी प्लॉट, नलावडे प्लॉट, पांगरी, पंकज नगर, पाटील प्लॉट, साईनगर, सावरकर रोड, शिवाजी नगर, सोलापूर रोड, सुभाष नगर, सुर्डी, तानाजी चौक, उपळे दुमाला, वैराग, करमाळ्यातील भवानी पेठ, गणेश नगर, गुळसडी, जिंती, केम, खडकपुरा, कृष्णाजी नगर, एसबीआय बॅंकेजवळ, पांडे, पर्णकुटी, सरपडोह, सावंत गल्ली, शाहूनगर, सिद्धार्थनगर, सिंचन नगर, तरडगाव, माढा तालुक्‍यातील बारलोणी, चांदवडी, दास प्लॉट, धानोरे, कव्हे, कुर्डुवाडी, माळी गल्ली, म्हसोबा गल्ली, निमगाव, रोपळे कव्हे, श्रीराम नगर, टेंभुर्णी, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, भांबुर्डी, बोरगाव, कोर्टासमोर माळशिरस, दहिगाव, फोंडशिरस, गायकवाड वस्ती, इंदापूर रोड, कचरेवाडी, कुरबावी, लवंग, माळेवाडी, मानकी चौक, मानकी, नातेपुते, पोस्ट ऑफिस जवळ, जुनी पंचायत समिती जवळ, पिंपरी, संग्रामनगर, शिक्षक कॉलनी, तांदुळवाडी, वेळापूर, मंगळवेढ्यातील बॅंक ऑफ इंडिया, भिमनगर, ब्रह्मपुरी, चोखामेळा नगर, दामाजी नगर, ढवळस, डोंगरगाव, हजारे गल्ली, हुलजंती, कात्राळ, शनिवार पेठ, सुतार गल्ली, मोहोळ मधील काकडे वस्ती, सुळे नगर, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील मार्डी, पंढरपुरातील आंबेडकर नगर, अनवली, चळे डाळे गल्ली, देगाव, देवडे, फुलचिंचोली, गणेश नगर, गाताडे प्लॉट, गोकुळ नगर, गोपाळपूर, इसबावी, जगदंबा वसाहत, जुना कराड नाका, कडबे गल्ली, कासेगाव, खर्डी, खेड भोसे, लक्ष्मी टाकळी, लिंकरोड, लोणारवाडी, मालपे चौक, माळीवस्ती, नाथ चौक, नवी पेठ, कैकाडी महाराज मठाजवळ, शेटे पेट्रोल पंपाजवळ, पळशी, पांढरेवाडी, पोलिस लाईन, रवी कृष्ण नगरी, रांझणी, सरकोली, स्टेशन रोड, वाखरी, वांगीकर नगर, सांगोल्यातील बलवडी, भिमनगर, दक्षता म्युन्सिपल हॉस्पिटल, दत्तनगर, देशपांडे गल्ली, देवळीस एकतपूर, हातीद, जय भवानी, जुजारपूर, जुनोनी, खडतरे गल्ली, किडबिसरी, महादेव गल्ली, महूद, आरएस कॉर्टर, शिवणे, वज्राबाद पेठ, वासूद, वासूद अकोला, वासुद रोड, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील कणबस, मंद्रूप, विडी घरकुल याठिकाणी आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 337 new corona affected in rural areas of Solapur today