मार्कंडेय रुग्णालयातील 34 डॉक्टरांनी कोव्हिडच्या रुग्ण सेवेकडे फिरवली पाठ

34 doctors at Markandey Hospital turned their backs on corona patient service
34 doctors at Markandey Hospital turned their backs on corona patient service

सोलापूर : सोलापूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापुरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापुरातील मार्कंडेय सहकारी रुग्णालय कोव्हिडच्या उपाययोजनेसाठी महापालिकेच्या ताब्यात दिले आहे. या रुग्णालयातील तब्बल 34 डॉक्टरांनी कोव्हिडच्या रुग्ण सेवेकडे पाठ फिरवली आहे.

हे डॉक्टर रुग्णालयात येत नाहीत. त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते प्रतिसाद देत नाहीत. यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 29 मे रोजी या 34 डॉक्टरांच्या नाव पत्ता व मोबाईल नंबरसह आदेश काढला आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी या डॉक्टरांना आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात. चोवीस तासाच्या डॉ. नवले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला या बाबतचा अहवाल सादर करावा. डॉक्टर हजर न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे. 

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
उपाययोजनेसाठी बीएमआयटी, व्हीव्हीपी महाविद्यालय प्रशासनाच्या ताब्यात

सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना बाधित  रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कोव्हिड केअर सेंटर (संस्थात्मक विलिनीकरण) स्थापन करण्यासाठी सोरेगाव येथील विद्या विकास प्रतिष्ठानच्या तंत्रनिकेतनची इमारत व बेलाटी येथील ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची इमारत जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली आहे. या दोन्ही महाविद्यालयाच्या इमारतीचा ताबा आता महापालिका आयुक्तांकडे असणार आहे. विद्या विकास प्रतिष्ठानच्या तंत्रनिकेतनमध्ये 150 तर  बीएमआयटीच्या महाविद्यालयामध्ये 180 एवढी विलिनीकरण क्षमता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com