अबब... दक्षिण सोलापुरात एकाच दिवशी आढळले 39 रुग्ण 

अबब... दक्षिण सोलापुरात एकाच दिवशी आढळले 39 रुग्ण 
Updated on

सोलापूर ः कोरोनाचा फैलाव दक्षिण सोलापूर तालुक्‍यात नवीन विडी घरकुल व कुंभारी या गावांपुरताच मर्यादीत होता. मात्र, हळूहळू तालुक्‍याच्या अन्य गावांमध्येही कोरोनाचा भयानक फैलाव सुरु झाला आहे. आज आलेल्या अहवालानुसार तालुक्‍यात एकाच दिवशी तब्बल 39 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात हा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. 

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्यावतीने दिलेल्या अहवालात आज एकाच दिवशी 66 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 39 जण एकट्या दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील आहेत. आज एकूण 236 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 170 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरित 66 जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. आज आढळेल्या 66 रुग्णांमध्ये 41 पुरुष तर 25 स्त्रियांचा समावेश आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या 673 एवढी झाली आहे. 

आज नव्याने उत्तर सोलापूर तालुक्‍यातील बाणेगावात दोन, कोंडीत एक, मार्डीत पाच, तिऱ्हे येथे पाच, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील नवीन विडी घरकूल येथे आठ, कुंभारी येथे दोन, लिंबिचिंचोळी येथे चार, मुळेगाव येथे दोन, मुळेगाव तांडा येथे तीन, उळेगाव येथे एक, कासेगाव येथे एक, हत्तूर येथे सहा, वांगीत पाच, मंद्रूपमध्ये दोन, बसवनगर येथे एक, वडापुरात एक, नांदणी येथे एक, होटगीत दोन, मोहोळ तालुक्‍यातील वाळूज येथे एक, माढा तालुक्‍यातील भोसरेत दोन, पंढरपूर तालुक्‍यातील गोपाळपुरात एक, मंगळवेढ्यातील बोराळे येथे एक, अक्कलकोटमधील बुधवारपेठेत एक, दुधनी येथे दोन, बोरगाव दे येथे एक, करजगी येथे एक, बार्शीतील कसबापेठेत एक, वैराग येथे दोन, घाणेगाव येथे एक रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे आजच्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. अद्यापही 52 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत 311 जण बरे होऊन घरी गेले आहेत तर 332 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Railway Project
Solapur ZP School
Marathi News Esakal
www.esakal.com