सोलापूरच्या ग्रामीण भागात 435 नवे कोरोनाबाधित 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या कंसात मृत्यू 
अक्कलकोट- 1015 (57), बार्शी- 4416 (144), करमाळा- 1816 (37), माढा- 2411 (75), माळशिरस- 3872 (73), मंगळवेढा- 1114 (22), मोहोळ- 998 (49), उत्तर सोलापूर- 678 (29), पंढरपूर- 4672 (144), सांगोला- 1762 (21), दक्षिण सोलापूर- 1242 (33), एकूण 23996 (659). 

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज दोन हजार 319 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एक हजार 844 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 435 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 258 पुरुष तर 177 महिलांचा समावेश आहे. आज पुन्हा 14 बळी कोरोनाने घेतले आहेत. त्यामध्ये 11 पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आत्तापर्यंत 23 हजार 996 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 659 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्त झाल्यामुळे अद्यापही सहा हजार 276 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 17 हजार 61 जण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी परतले आहेत. आज दहिगाव (ता. माळशिरस) येथील 52 वर्षाचे पुरुष, भोसले (ता. माढा) येथील 68 वर्षाचे पुरुष, कुडुवाडी (ता. माढा) येथील 67 वर्षाची महिला, मोहोळ येथील 70 वर्षाची महिला, फोंडशिरस (ता. माळशिरस) येथील 65 वर्षाचे पुरुष, भुताष्टे (ता. माढा) येथील 80 वर्षाचे पुरुष, वेळापूर (ता. माळशिरस) येथील 71 वर्षाचे पुरुष, अनगर (ता. मोहोळ) येथील 73 वर्षाचे पुरुष, विंचूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील 74 वर्षाचे पुरुष, केसकरवाडी (ता. पंढरपूर) येथील 55 वर्षाचे पुरुष, निमगाव (ता. माळशिरस) येथील 60 वर्षाचे पुरुष, भूताष्टे (ता. माढा) येथील 74 वर्षाचे पुरुष, वाखरी (ता. पंढरपूर) येथील 70 वर्षाची महिला तर पिसेवाडी (ता. माळशिरस) येथील 50 वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 435 new corona in rural areas of Solapur