महिलांना नावालाच 50 टक्‍के आरक्षण ! महापालिका सभागृहात 'ती'चा आवाज दबलेलाच

तात्या लांडगे
Thursday, 21 January 2021

महापालिकेत ठरावीक जणांचीच मक्‍तेदारी
महापालिकेची सर्वसाधारण सभा असो की बजेट मिटींग असो, सर्वात प्रथम महिला नगरसेविका उपस्थित राहतात. सभागृहातील सर्व विषयांवर चर्चा होऊन त्याचा निर्णय होईपर्यंत बहूतांश महिला नगरसेविका जागा सोडत नाहीत. परंतु, आपल्या प्रभागातील जनतेचे प्रश्‍न सुटावेत, त्यांच्या अडचणी सभागृहासमोर मांडायला हव्यात, या हेतूने महिला नगरसेविकांची उपस्थिती लक्षणीय असते. मात्र, सत्ताधारी व विरोधी पक्षातील ठरावीक नगरसेवकांचाच सभेत मोठा आवाज असतो. त्यामुळे ठरावीक नगरसेवकांचीच महापालिकेच्या सभेत बोलण्याची मक्‍तेदारी आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. अन्य नगरसेवकांना महापालिका समजतच नाही का, त्यांच्या प्रभागातच काहीच प्रश्‍न नाहीत का, आम्हाला काम नाही म्हणून सभेसाठी येतो का, असे विविध प्रश्‍न महिला नगरसेविकांनी उपस्थित केले आहेत. महिला नगरसेविकांनाही बोलण्याचा तेवढाच अधिकार मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी 'सकाळ'च्या माध्यमातून व्यक्‍त केली आहे.

सोलापूर : कायद्याने महिलांना राजकीय क्षेत्रात 50 टक्‍के आरक्षण दिले असून आता सोलापूर महापालिकेत महिला नगरसेविकांची संख्या 51 आहे. मात्र, सहा-सात नगरसेविका वगळता अन्य कोणत्याही महिलांना सभागृहात बोलूच दिले जात नसल्याचे चित्र आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पहायला मिळाले. नगरसेविका सुनिता रोटे, स्थायी समितीच्या सभापती अनुराधा काटकर, श्रीदेवी फुलारे, वंदना गायकवाड, फिरदोस पटेल यासह अन्य काही नगरसेविकांनी विविध विषयांवर बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना त्यांचे मत मांडण्याची संधीच मिळाली नाही.

महापालिकेत ठरावीक जणांचीच मक्‍तेदारी
महापालिकेची सर्वसाधारण सभा असो की बजेट मिटींग असो, सर्वात प्रथम महिला नगरसेविका उपस्थित राहतात. सभागृहातील सर्व विषयांवर चर्चा होऊन त्याचा निर्णय होईपर्यंत बहूतांश महिला नगरसेविका जागा सोडत नाहीत. परंतु, आपल्या प्रभागातील जनतेचे प्रश्‍न सुटावेत, त्यांच्या अडचणी सभागृहासमोर मांडायला हव्यात, या हेतूने महिला नगरसेविकांची उपस्थिती लक्षणीय असते. मात्र, सत्ताधारी व विरोधी पक्षातील ठरावीक नगरसेवकांचाच सभेत मोठा आवाज असतो. त्यामुळे ठरावीक नगरसेवकांचीच महापालिकेच्या सभेत बोलण्याची मक्‍तेदारी आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. अन्य नगरसेवकांना महापालिका समजतच नाही का, त्यांच्या प्रभागातच काहीच प्रश्‍न नाहीत का, आम्हाला काम नाही म्हणून सभेसाठी येतो का, असे विविध प्रश्‍न महिला नगरसेविकांनी उपस्थित केले आहेत. महिला नगरसेविकांनाही बोलण्याचा तेवढाच अधिकार मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी 'सकाळ'च्या माध्यमातून व्यक्‍त केली आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता असून मागील अडीच वर्षात शोभा बनशेट्टी या महापौर होत्या. तर आता श्रीकांचना यन्नम या महापौर आहेत. महिला महापौर असतानाही आम्हाला बोलण्याची संधी मिळत नाही, असा दबक्‍या आवाजातील सूर आजच्या सभेत ऐकायला मिळाला. गोल्डन व सडेतोड बोलणाऱ्या नगरसेविका म्हणून श्रीदेवी फुलारे यांची ओळख आहे. त्यांनी बोलण्याच्या संधीची वाट पाहिली. बाळे येथील स्मशानभूमीच्या जागेबद्दल आनंद चंदनशिवे बोलत असतानाच सभागृहात फुलारे यांनी मुस्लिम कब्रस्तान व त्याठिकाणच्या पाण्याच्या टाकीचा विषय मांडायला सुरवात करताच त्यांना खाली बसावे लागले. रमाई आंबेडकर यांच्या स्मारकावर बोलण्यास नगरसेविका वंदना गायकवाड बोलण्यासाठी उभ्या राहिल्या, मात्र त्यांना बोलू दिले जात नसल्याचे लक्षात येताच आठ- दहा महिला नगरसेविकांनी स्मारकाचा मुद्दा उचलला. त्यानंतर रिपन हॉलशेजारील ऍडव्हेंचर चिल्ड्रन पार्क आणि राणी लक्ष्मीबाई मंडईसह अन्य एका ठिकाणी पार्किंगची सोय करण्याचा विषय सभागृहात आला. त्यावेळी पार्किंगची व्यवस्था सोडा, अगोदर मागील काही वर्षांपासून तसेच पडून असलेले ऍडव्हेंचर पार्क कधी सुरु होणार, असा विषय फिरदोस पटेल यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे ऐकूनच न घेतल्याने मुकाट्याने खाली बसण्याची नामुष्की पटेल यांच्यावर ओढावली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा तथा नगरसेविका सुनिता रोटे यांनी त्यांच्या प्रभागातील शौचालये व स्वच्छतागृहांच्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही खाली बसावे लागले. स्थायी समितीच्या नुतन सभापती अनुराधा काटकर यांनी महिला अधिकाऱ्यांवरील तडकाफडकीच्या कारवाईच्या मुद्‌द्‌यावर उद्यान अधीक्षक श्री. कांबळे यांच्या गैरव्यवहाराचे पुरावे देऊनही त्यांच्यावर काय कारवाई झाली, असा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या समितीच्या सभापती असतानाही त्यांना बोलता आले नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50 percent reservation for women in name only; Women are not allowed to speak in the municipal hall, sometimes they are allowed to speak less