सोलापूरच्या ग्रामीण भागात आज 503 नवे कोरोनाबाधित 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 503 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज एकूण दोन हजार 668 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोन हजार 165 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 503 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज कोरोनामुळे दहा जणांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या आता 22 हजार 670 एवढी झाली आहे तर मृत्यूंची संख्या 628 एवढी झाली आहे. कोरोनामुळे बाधित झाल्याने सात हजार 112 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर कोरोनातून मुक्त झाल्यामुळे 14 हजार 930 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 

आज वाखरी (ता. पंढरपूर) येथील 76 वर्षाचे पुरुष, वाघोली (ता. मोहोळ) येथील 67 वर्षाचे पुरुष, दोड्डी (ता. दक्षिण सोलापूर) येथील 86 वर्षाची महिला, अकलूज (ता. माळशिरस) येथील 63 वर्षाचे पुरुष, निमगाव (ता. माळशिरस) येथील 73 वर्षाचे पुरुष, टेंभुर्णी (ता. माढा) येथील 74 वर्षाची महिला, भांबेवाडी (ता. मोहोळ) येथील 60 वर्षाची महिला, भोसे (ता. मंगळवेढा) येथील 60 वर्षाची महिला, सोलापूर रोड बार्शी येथील 78 वर्षाचे पुरुष तर उपळे दुमाला (ता. बार्शी) येथील 75 वर्षांच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या कंसात मृत्यू 
अक्कलकोट- 856 (57), बार्शी- 4202 (142), करमाळा- 1757 (34), माढा- 2286 (70), माळशिरस- 3646 (71), मंगळवेढा- 1040 (22), मोहोळ- 957 (44), उत्तर सोलापूर- 658 (29), पंढरपूर- 4459 (109), सांगोला- 1589 (20), दक्षिण सोलापूर- 1220 (30), एकूण- 22670 (628) 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 503 new corona affected in rural areas of Solapur today