सोलापूर जिल्ह्यातील 54 ग्रामपंचायती बिनविरोध, निवडणुक रिंगणात राहिले 12225 उमेदवार 

logo
logo
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 8 हजार 455 उमेदवारांनी आज 8 हजार 664 अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुक रिंगणात आता 12 हजार 225 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. या 12 हजार 225 उमेदवारांचे 12 हजार 366 उमेदवारी अर्ज कायम राहिले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 54 ग्रामपंचायतीच्या निवडी आज बिनविरोध झाल्या आहेत. बिनविरोध ग्रामपंचायती करण्यामध्ये मोहोळ तालुक्‍याने बाजी मारली आहे. या तालुक्‍यातील सर्वाधिक 13 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 

मोहोळ तालुक्‍यातील अनगर, बिटले, खंडोबाची वाडी, कुरणवाडी, सिध्देवाडी, तेलंगवाडी, पासलेवाडी/गलंदवाडी, नालबंदवाडी, वाघोली, वडवळ, शिरापूर मो, पिरटाकळी, आढेगांव या ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. मंगळवेढा तालुक्‍यातील मुढवी, माढा तालुक्‍यातील निमगाव टें., जामगाव, सापटणे (भोसे), महातपूर, वडाचीवाडी (त. म.), खैराव, धानोरे, फुटजवळगाव या आठ ग्रामपंचायतीच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. अक्कलकोट तालुक्‍यातील उडगी, आंदेवाडी बु., कुमठे, नागनहळ्ळी, तोळणूर, मातनहळ्ळी, हंद्राळ, बणजगोळ, शिरसी या नऊ ग्रामपंचायतीच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. 

बार्शी तालुक्‍यातील पिंपळगाव (पा.), जामगाव (पा.), हळदुगे, रातंजन, खामगाव या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. पंढरपूर तालुक्‍यातील जैनवाडी ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. सांगोला तालुक्‍यातील तिप्पेहळी, मेथवडे, वाटंबरे, चोपडी, गायगव्हाण या ग्रामपंचायती तर करमाळा तालुक्‍यातील जेऊरवाडी व सालसे या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उत्तर सोलापूर तालुक्‍यातील पाथरी व पडसाळी, माळशिरस तालुक्‍यातील गिरझणी व गोरडवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील बोरामणी, संगदरी, तिर्थ, दिंडूर, लिंबी चिंचोळी आणि बाळगी या सहा ग्रामपंचायतीच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mohol Ganesh Mandal News
Pune Teachers Constituency
Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Marathi News Esakal
www.esakal.com