सोलापूरच्या ग्रामीण भागात 549 नवे कोरोनाबाधित; पुन्हा 16 जणांचा मृत्यू 

संतोष सिरसट 
Friday, 11 September 2020

कोरोनाबाधितांची तालुकानिहाय स्थिती कंसात मृत्यू 
अक्कलकोट-765 (46), बार्शी-3173 (122), करमाळा-1088 (27), माढा-1472 (51), माळशिरस-2104 (42), मंगळवेढा-729 (15), मोहोळ-728 (33), उत्तर सोलापूर-568 (23), पंढरपूर-3401 (76), सांगोला-926 (10), दक्षिण सोलापूर-1121 (23), एकूण-16075 (468). 

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. आज पुन्हा एकदा 549 नवे कोरोनाबाधित रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत. आज चार हजार 711 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी चार 162 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 549 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एवढेच नाही तर आज पुन्हा एकदा 16 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनामुळे आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या आता 16 हजार 75 एवढी झाली आहे तर 468 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे आजच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. आज संभाजीनगर कुर्डूवाडी येथील 49 वर्षाचे पुरुष, अण्णाभाऊ साठे नगर मोहोळ येथील 56 वर्षांचे पुरुष, आश्रम शाळा वाखरी (ता. पंढरपूर) येथील 52 वर्षांचे पुरुष, एकतपूर रोड सांगोला येथील 81 वर्षाचे पुरुष, भुताष्टे (ता. माढा) येथील 68 वर्षाचे पुरुष, सरकोली (ता. पंढरपूर) येथील 50 वर्षाची महिला, बेंबळे (ता. माढा) येथील 39 वर्षाचे पुरुष, फुलचिंचोली (ता. पंढरपूर) येथील 70 वर्षाचे पुरुष, देवडे (ता. पंढरपूर) येथील 85 वर्षांचे पुरुष, बावी (ता. बार्शी) येथील 55 वर्षाची महिला, भांडेगाव (ता. बार्शी) येथील 77 वर्षाचे पुरुष, वडशिंगे (ता. माढा) येथील 50 वर्षाचे पुरुष, वेळापूर (ता. माळशिरस) येथील 70 वर्षाची महिला, लांबोटी (ता. मोहोळ) येथील 85 वर्षाचे पुरुष, दुधनी (ता. अक्कलकोट) येथील 60 वर्षाचे पुरुष तर भोगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील 71 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 549 new corona in rural areas of Solapur; Again 16 people died