सोलापूरच्या ग्रामीण भागात 557 नवीन कोरोनाबाधित 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

कोरोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या कंसात मृत्यू 
अक्कलकोट- 820 (52), बार्शी- 3678 (131), करमाळा- 1381 (32), माढा- 1910 (57), माळशिरस- 2745 (57), मंगळवेढा- 922 (17), मोहोळ- 856 (36), उत्तर सोलापूर- 636 (27), पंढरपूर- 3945 (91), सांगोला 1239 (17), दक्षिण सोलापूर- 1173 (26), एकूण 19305 (543). 

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज एकूण तीन हजार 365 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन हजार 805 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 557 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्त होऊन आज 340 जण आपापल्या घरी परतले आहेत. 

आज आलेल्या अहवालानुसार आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या 19 हजार 305 एवढी झाली आहे. त्याचबरोबर 543 जणांना आतापर्यंत कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. अद्यापही रुग्णालयात सहा हजार 578 जण उपचार घेत असून कोरोनामुक्त होऊन 12 हजार 184 जण आपल्या घरी सुखरूप परतले आहेत. 

आज नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील 81 वर्षाचे पुरुष, कामती (ता. मोहोळ) येथील 34 वर्षांची महिला, कुंभार गल्ली पंढरपूर येथील 57 वर्षाची महिला, जेऊर )ता. करमाळा) येथील 90 वर्षाचे पुरुष, दर्गनहळ्ळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील 55 वर्षाची महिला, बालाजी कॉलनी बार्शी येथील 67 वर्षांचे पुरुष, नातेपुते (ता. माळशिरस) येथील 60 वर्षाचे पुरुष, शनी गल्ली सांगोला येथील 63 वर्षाची महिला, उडनवाडी (ता. सांगोला) येथील 70 वर्षाची महिला, शेटफळ (ता. मोहोळ) येथील 67 वर्षाचे पुरुष, नाडी (ता. माढा) येथील 67 वर्षाची महिला तर जाधव प्लॉट माळशिरस येथील 85 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 557 new corona affected in rural areas of Solapur