सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 59 नवे कोरोनाबाधित 

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 59 नवे कोरोनाबाधित 

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागला आहे. आज आलेल्या अहवालावरुन नव्या 59 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या 1172 एवढी झाली आहे. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील 278 जणांचे अहवाल प्रसिद्ध केले. त्यामध्ये 219 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 59 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज सांगोल्यातील कोळा येथे एक, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील भंडारकवठेत आठ, मंद्रूपमध्ये एक, कुंभारीत दोन, शिरवळ व वळसंगमध्ये प्रत्येकी एक, मोहोळ तालुक्‍यातील इंजगावमध्ये एक, करमाळा शहरातील सिद्धार्थनगरात एक, जिंती येथे एक, माढा तालुक्‍यातील भोसरे व रिधोरे येथे प्रत्येकी एक, माळशिरस तालुक्‍यातील माळिनगर येथे एक, सदाशिवनगर येथे तीन, यशवंतनगर येथे एक, अकलूज येथे, विझोरी येथे एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. अक्कलकोट तालुक्‍यातील मैंदर्गीत तीन, भोसगा येथे दोन, हंजगी येथे एक, नागनहळ्ळी येथे एक, पंढरपुरातील व्यासनगर झोपडपट्टी. घोंगडे गल्ली, गांधी रोड, उत्पात गल्ली, गोविंदपुरा, रोहिदास चौक, अनिलनगर, जुनीपेठ, जिजाऊनगर, इसबावी येथे प्रत्येकी एक तर तालुक्‍यातील भोसे येथे एक रुग्ण आढळला. मंगळवेढा तालुक्‍यातील सरगर, नंदूर येथे प्रत्येकी एक, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील कौठाळी येथे एक, बाणेगाव येथे तीन, हगलूर येथे एक, मार्डी येथे सात जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com