धोका वाढतोय : करमाळा तालुक्‍यात एकाच दिवशी 62 कोरोनाबाधितांची भर 

अण्णा काळे 
Monday, 14 September 2020

आजपर्यंत करमाळा तालुक्‍यातील 836 कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहे. सध्या 490 जणांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तालुक्‍यात एकूण 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्‍यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1348 झाली आहे. 

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहर व तालुक्‍यात सोमवारी 319×रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये 62 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यात 40 पुरुष तर 22 महिलांचा समावेश आहे. करमाळा तालुक्‍यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1348 वर गेली आहे. करमाळा शहरात आज 176 रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये 27 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 
आज शहरातील गुजरगल्ली एक पुरुषकुंकू गल्ली तीन पुरुष व एक महिला, शिवाजीनगर एक पुरुष व एक महिला, जाधव प्लॉट एक पुरुष, बागवान नगर पाच पुरुष व तीन महिला, मार्केट यार्ड एक पुरुष, चांदगुडे गल्ली एक महिला, राशीन पेठ एक पुरुष व एक महिला, मेनरोड दोन पुरुष व दोन महिला, कमलाई नगर एक पुरुष, सिंचननगर एक महिला, कानाड गल्ली एक पुरुष यांचा समावेश आहे. तर ग्रामीण भागात 143 रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये 35 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये पिंपळवाडी एक पुरुष, कोळगाव एक पुरुष, कुंभेज एक पुरुष व तीन महिला, दाहीखिंडी एक पुरुष, वीट तीन पुरुष व पाच महिला, साडे तीन पुरुष, पोफळज एक पुरुष, मोरवड एक पुरुष, वांगी नं.1मध्ये एक पुरुष, पांगरे एक पुरुष, शेटफळ चार पुरुष व 4 महिला पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. आज 33 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून आजपर्यंत 836 कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहे. सध्या 490 जणांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तालुक्‍यात एकूण 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्‍यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1348 झाली आहे. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 62 coronet victims in Karmala taluka on the same day