esakal | अर्रार्र ! टायपिंगमध्ये पदोन्नतीवरील 'एवढे' लिपिक नापास; आयुक्‍त म्हणाले... 
sakal

बोलून बातमी शोधा

4Computer_Typing - Copy.jpg

दुसऱ्या संधीत उत्तीर्ण व्हावेच लागेल
पदोन्नती मिळूनही महापालिकेतील लिपिकांना टायपिंग, संगणक परीक्षा द्यावी लागेल. परीक्षेत नापास झालेल्यांना आणखी एक संधी दिली जाईल. त्यानंतर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करणार आहे.
- पी. शिवशंकर, आयुक्‍त, सोलापूर महापालिका

अर्रार्र ! टायपिंगमध्ये पदोन्नतीवरील 'एवढे' लिपिक नापास; आयुक्‍त म्हणाले... 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : पदोन्नतीने लिपीक होऊन मोठ्या पगाराची नोकरी करणाऱ्या लिपिकांना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी बहुतेकवेळा वेगळेच काम दिले. त्यामुळे टायपिंगपासून खूप दूर गेलेल्या 65 टक्‍के लिपिकांना टायपिंग परीक्षेत उत्तीर्ण होता आले नाही. तत्पूर्वी, आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी त्यांना टायपिंग आणि संगणक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले असून दीड महिन्यानंतर पुन्हा त्यांना फेरपरीक्षा द्यावी लागणार आहे. त्यात नापास होणाऱ्यांवर मात्र, निश्‍चितपणे कारवाई करणार असल्याचे आयुक्‍तांनी स्पष्ट केले आहे.

महापालिका आयुक्‍तांनी लिपिकांना टायपिंग आणि संगणक परीक्षा बंधनकारक केल्यानंतर हा निर्णय रद्द करण्यासाठी कामगार संघटनांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. मात्र, आयुक्‍त त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. या कर्मचाऱ्यांना कर वसुलीसह अन्य कामे दिल्याने टायपिंग तथा संगणक येत नसल्याचे अनेकांनी आयुक्‍तांना सांगितले. त्यामुळे आयुक्‍तांनी त्यांना दुसरी संधी देण्याचे मान्य केले. 50 वर्षांवरील लिपिकांना टायपिंग तर 50 वर्षांखालील लिपिकांना टायपिंग आणि संगणक अशा दोन परीक्षा द्याव्या लागणार आहेत. तुर्तास टायपिंगची परीक्षा घेतली आहे. दुसऱ्या संधीत नापास झालेल्यांना संगणक परीक्षा द्यावी लागणार आहे. मात्र, दोन्ही परीक्षेत नापास झालेल्यांवर कारवाई केली जाणार आहे.

परीक्षेनंतर उत्तरपत्रिका घेतल्या ताब्यात
महापालिकेतील 532 लिपिकांची टायपिंगची परीक्षा काही दिवसांपूर्वी पार पडली. या परीक्षेनंतर आयुक्‍तांनी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्व उत्तरपत्रिका ताब्यात घेतल्या होत्या. या परीक्षेसाठी नऊ लिपिक गैरहर राहिले. 523 लिपिकांनी टायपिंगची परीक्षा दिली. या परीक्षेत तब्बल 350 हून अधिक लिपिक नापास झाले आहेत. परीक्षा झाल्यानंतर त्यामध्ये छेडछाड होणार नाही याची खबरदारी आयुक्‍तांनी घेतली होती. या परीक्षेचा निकाल आयुक्‍तांनी गुपितच ठेवला आहे

दुसऱ्या संधीत उत्तीर्ण व्हावेच लागेल
पदोन्नती मिळूनही महापालिकेतील लिपिकांना टायपिंग, संगणक परीक्षा द्यावी लागेल. परीक्षेत नापास झालेल्यांना आणखी एक संधी दिली जाईल. त्यानंतर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करणार आहे.
- पी. शिवशंकर, आयुक्‍त, सोलापूर महापालिका