esakal | ग्राम सडक योजनेतून 7 कोटी 42 लाख निघी मंजूर : विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांची माहिती

बोलून बातमी शोधा

mangalvedha rasta.jpg}

 स्व. आ. भारत भालके यांनी 2014 पासूनचे प्रयत्न भगीरथ भालके यांनी केलेला पाठपुरावा कामी आला असून या पुलामुळे या भागातील नागरिकांची  गैरसोय दूर होणार आहे. तालुक्यातील रहाटेवाडी गावाकडून तामदर्डी कडे जाणाऱ्या पूलाची मागणी गेल्या अनेक दिवसापासून होत होती रहाटेवाडी ते तामदर्डी, तांडोर, सिद्धापूर म्हातोळी या रस्त्याचे काम आ. भारत भालके यांनी प्रधानमंत्री सडक योजने मधून पाठपुरावा करून मंजूर करून काम पूर्ण करून घेतले होते.

ग्राम सडक योजनेतून 7 कोटी 42 लाख निघी मंजूर : विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांची माहिती
sakal_logo
By
हुकूम मुलानी

मंगळवेढा (सोलापूर)   अनेक दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या रहाटेवाडी -तामदर्डी व हुलजंती ते सलगर खु येथील ओढ्यावरील  पुलास मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 7 कोटी 42 लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी केली.
 स्व. आ. भारत भालके यांनी 2014 पासूनचे प्रयत्न भगीरथ भालके यांनी केलेला पाठपुरावा कामी आला असून या पुलामुळे या भागातील नागरिकांची  गैरसोय दूर होणार आहे. तालुक्यातील रहाटेवाडी गावाकडून तामदर्डी कडे जाणाऱ्या पूलाची मागणी गेल्या अनेक दिवसापासून होत होती रहाटेवाडी ते तामदर्डी, तांडोर, सिद्धापूर म्हातोळी या रस्त्याचे काम आ. भारत भालके यांनी प्रधानमंत्री सडक योजने मधून पाठपुरावा करून मंजूर करून काम पूर्ण करून घेतले होते.

परंतु येथील पुलासाठी जमिनीला धर नसल्यामुळे जास्त निधीसाठी रखडले. तसेच भीमा नदीला पूर आल्यानंतर नदीचे पाणी या ओढ्यातून मागे सरकल्यामुळे वाहतूकीसाठी अडचणी येत होत्या त्यामुळे नागरिकांनी आ. भालके यांच्याकडे रहाटेवाडी ते तामदर्डी रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याला या ओढ्यावरती पूलाची मागणी करत  2014 च्या लोकसभा निवडणुकीत येथील ग्रामस्थानी निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.

तसेच हुलजंती ते सलगर खुर्द या रस्त्याचे देखील काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्ण झाले होते परंतु तेथील पुलाचे काम झाले नव्हते. या दोन्ही पूलांच्या पूर्ततेसाठी स्व. भालकेनी शासनाकडे पाठपुरावा करीत निधीची मागणी केली होती. परंतु विरोधी आमदारामुळे   निधी देण्यास टाळाटाळ केली.

याबाबत दैनिक सकाळचे 29 मे 2019 च्या अंकात वृत्त प्रसिद्ध करत या भागातील 700 एकर क्षेत्र पुलाअभावी क्षारपड झाल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. सत्ता बदलानंतर काही महिन्यात स्व  भालके यांचे निधन झाल्यानंतर भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करीत या दोन पूलांचा निधीचा प्रश्न मार्गी लावला. या दोन पुलांच्या बांधणीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन च्या माध्यमातून रहाटेवाडी  गावानजीक तामदर्डी रस्त्यावरील पुलासाठी 4 कोटी 1 लाख रुपये मंजूर झाले असून पाच वर्षाच्या देखभाल दुरुस्तीसाठी 9 लाख रुपये मंजूर झाले. या पुलाची लांबी 58.63 मीटर आहे तर हुलजंती ते सलगर खु पुलाची लांबी 78.80 मीटर असून या पुलासाठी 3कोटी 41 लाख रु मंजूर झाले आहेत तर देखभाल दुरुस्तीसाठी 6लाख 86 हजाराची तरतूद केली आहे.