44 लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात दररोज सव्वादोन हजारच टेस्ट ! सोलापूर जिल्ह्यात एका दिवसात वाढले 75 रुग्ण

4sakal_20_2827_29.jpg
4sakal_20_2827_29.jpg

सोलापूर : शहर- जिल्ह्यातील दोन हजार 224 संशयितांमध्ये आज (शनिवारी) 75 रुग्ण आढळले असून शहरातील 94 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाचा जोर धरु लागला आहे. सोलापूर शहर- जिल्ह्याची लोकसंख्या 44 लाखांपर्यंत असतानाही कोरोना संशयितांची टेस्ट वाढलेल्या नाहीत. आता या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे प्रशासनाला काय सूचना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक बाबी...

  • ग्रामीण भागातील एकूण रुग्णसंख्या 40 हजार 157 तर एक हजार 174 रुग्णांचा झाला मृत्यू
  • शहरात आतापर्यंत आढळले 12 हजार 154 रुग्ण; 650 जणांचा झाला मृत्यू
  • बार्शी व माढा तालुक्‍यातील प्रत्येकी 41 रुग्णांवर आहेत उपचार सुरु
  • करमाळ्यात सर्वाधिक ऍक्‍टिव्ह रुग्ण; 53 रुग्ण घेत आहेत उपचार
  • पंढरपूर तालुक्‍यात 46 तर माळशिरसमध्ये आहेत 39 ऍक्‍टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातच कोरोनाचे रुग्ण अधिक आढळत आहेत. तत्पूर्वी, ग्रामीण भागातील दररोज तीन हजार संशयितांची टेस्ट केली जाईल, असे जिल्हा परिषदेने स्पष्ट केले आहे. मात्र, अद्याप त्यानुसार कार्यवाही होऊ शकलेली नाही. आज (ता. 20) ग्रामीण भागातील एक हजार 688 संशयितांची टेस्ट करण्यात आली. त्यात 55 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे शहरातील 536 संशयितांमध्ये 20 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 16 फेब्रुवारीला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या 94 वर्षीय पुरुषाचा शुक्रवारी (ता. 19) कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे महापालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सध्या शहरातील 436 तर ग्रामीण भागातील 332 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, आतापर्यंत शहरातील सात हजार 210 पुरुषांना आणि चार हजार 944 महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 439 पुरुष तर 211 महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील 24 हजार 950 पुरुषांना तर 15 हजार 207 महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. एकूण रुग्णांपैकी 846 पुरुषांचा आणि 328 महिलांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दरम्यान, अंगणवाडी सेविका, आशासेविका यांना दररोज 50 कुटुंबाची जबाबदारी देऊन होम-टू-होम सर्व्हे करावा, 'गाव कोरोनामुक्‍त' या मोहिमेअंतर्गत अधिक भर देण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com