
कोरोनाची विशेष उपाययोजना
मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याच्या तापमानाची नोंद घेतली जात आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराच्या हातावर सॅनिटायझरची फवारणी केली जात आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे.
सोलापूर : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी सोलापूर जिल्ह्यात चुरशीने मतदान होत आहे. सकाळी 8 ते 10 या कालावधीत पदवीधरसाठी 7.69 टक्के तर शिक्षकसाठी 12.33 टक्के मतदान झाले आहे. मतदारांना मतदानाला बाहेर काढण्यासाठी प्रशासनासह सर्वच लोकप्रतिनिधींच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.
पदवीधर मतदार संघासाठी सोलापूर जिल्ह्यात एकूण मतदान केंद्रे 123 आहेत. या निवडणुकीत पुरुष पदवीधर मतदार 42 हजार 70 तर स्त्री पदवीधर मतदारांची संख्या 11 हजार 742
एवढी आहे. इतर पदवीधरचा 1 मतदार आहे. एकूण एकूण पदवीधर मतदारांची संख्या 53 हजार 813 आहे. सकाळी 8 ते 10 या कालावधीत 3 हजार 579 पदवीधर पुरुषांनी तर 559 एवढ्या महिला पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 4 हजार 138 (मतदान टक्केवारी 7.69) एवढ्या मतदारांनी मतदान केले आहे.
शिक्षक मतदार संघासाठी एकूण मतदान केंद्रे 74 असून पुरुष शिक्षक मतदारांची संख्या 10 हजार 561 तर स्त्री शिक्षक मतदारांची संख्या 3 हजार 23 अशी एकूण शिक्षक मतदार संख्या 13 हजार 584 एवढी आहे. सकाळी 8 ते 10 या कालावधीत 1 हजार 487 पुरुष शिक्षक मतदारांनी तर 188 एवढ्या महिला शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 1 हजार 675 एवढ्या शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदानाची टक्केवारी 12.33 एवढी आहे.