कोरोना काळातील सर्व्हेत पारदर्शकता किती?
जगभर कोरोनाची महामारी असताना नागरिकांमध्ये विशेषत: खेड्यापाड्यातील नागरिकांमध्ये अद्याप भिती कायम आहे. जिल्हाभरात तीन लाखांपर्यंत को- मॉर्बिड रुग्ण असून त्यातील अकराशेहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना काळात को- मॉर्बिड रुग्णांचा सर्व्हे करणाऱ्या शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांना बहुतेक लोक घरात येऊ देत नसल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाने 1 ते 31 डिसेंबर या काळात तब्बल 32 लाख 77 हजार 258 नागरिकांची कुष्ठरोग आणि क्षयरोगाच्या अनुषंगाने तपासणी केल्याचा अहवाल आरोग्याधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे एका महिन्यात झालेला हा सर्व्हे पारदर्शक झाला का, खरोखरच तेवढ्या नागरिकांची तपासणी झाली का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दरवर्षी हे अभियान राबवूनही रुग्णसंख्या वाढतच असल्याने या सर्व्हेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
सोलापूर : जिल्ह्यात डिसेंबर 2020 मध्ये कुष्ठरोग व क्षयरोग शोध अभियान राबविण्यात आले. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 32 लाख 79 हजार 929 नागरिकांच्या सर्वेक्षणाचे उद्दिष्टे ठेवून नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात 552 नवे क्षय रुग्ण आणि 82 नवे कुष्ठरोगाचे रुग्ण आढळले आहेत.
कोरोना काळातील सर्व्हेत पारदर्शकता किती?
जगभर कोरोनाची महामारी असताना नागरिकांमध्ये विशेषत: खेड्यापाड्यातील नागरिकांमध्ये अद्याप भिती कायम आहे. जिल्हाभरात तीन लाखांपर्यंत को- मॉर्बिड रुग्ण असून त्यातील अकराशेहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना काळात को- मॉर्बिड रुग्णांचा सर्व्हे करणाऱ्या शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांना बहुतेक लोक घरात येऊ देत नसल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाने 1 ते 31 डिसेंबर या काळात तब्बल 32 लाख 77 हजार 258 नागरिकांची कुष्ठरोग आणि क्षयरोगाच्या अनुषंगाने तपासणी केल्याचा अहवाल आरोग्याधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे एका महिन्यात झालेला हा सर्व्हे पारदर्शक झाला का, खरोखरच तेवढ्या नागरिकांची तपासणी झाली का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दरवर्षी हे अभियान राबवूनही रुग्णसंख्या वाढतच असल्याने या सर्व्हेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
कुष्ठरोग व क्षयरोग शोध अभियानाअंतर्गत संशयित आढळलेल्यांच्या थुंकीचे नमुने गोळा करण्यात आले. त्यात 42 हजार 115 संशयित क्षयरोगाचे होते, तर 11 हजार 420 कुष्ठरोगाचे संशयित आढळले. त्यामध्ये विविध चाचण्या केल्यानंतर क्षयरोग व कुष्ठरोग झालेल्या रुग्णांची माहिती संकलित करण्यात आली. या रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर औषोधपचार केल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली. त्यासाठी आशासेविका, आरोग्य कर्मचारी व सामाजिक स्वयंसेवकांची मदत घेतल्याचेही ते म्हणाले. या अभियानावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाभर सर्वेक्षण पथकांची नियुक्ती केली होती. मात्र, बहुतांश गावांमध्ये हा सर्व्हे नावालाच झाल्याची तथा घराबाहेरुनच सर्व्हे झाल्याची चर्चा आहे. कोट्यवधींचा खर्च करुनही अद्याप ना महाराष्ट्र ना सोलापूर कुष्ठरोग आणि क्षयरोग मुक्त झाले.