सोलापुरात उरले 826 कोरोना पॉझिटिव्ह ! आज आढळले 103 नवे रुग्ण; कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर तीन तालुके 

तात्या लांडगे
Sunday, 17 January 2021

सोलापूर शहरातील एक लाख 47 हजार 557 संशयितांमध्ये 11 हजार 474 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात चार लाख 38 हजार 95 संशयितांमध्ये 39 हजार 66 व्यक्‍ती कोरोना बाधित सापडल्या आहेत.

सोलापूर : शहरात आज 732 संशयितांमध्ये 32 पॉझिटिव्ह आढळले असून जिल्ह्यात एक हजार 642 संशयितांमध्ये 71 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ग्रामीण भागातील दोघांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 349 तर जिल्ह्यातील 477 ऍक्‍टिव्ह रुग्णांवर त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

 

शहरात 'याठिकाणी' सापडले नवे रुग्ण 
बुधवार पेठ, विनायक नगर, सैफूल, महावीर सोसायटी, निरापाम सोसायटी, वृदांवन पार्क (विजयपूर रोड), मंगल रेसिडेन्सी (जुळे सोलापूर), भोईटे गल्ली (देगाव), जिल्हा परिषदेजवळ (देगाव), बदलवा नगर (शेळगी), गणेश पेठ शॉपिंग सेंटरजवळ (मंगळवार पेठ), गांधी नगर (दक्षिण सदर बझार), भाग्योदय सोसायटी, सम्राट चौक, दक्षिण सदर बझार, सिध्दश्री अपार्टमेंट (सम्राट चौक), केगाव, रेल्वे लाईन्स (वाडीया हॉस्पिटलजवळ), भोपाळ नगर (मजरेवाडी), 70 फूट रोड, देगाव, बेगम पेठ, पश्‍चिम मंगळवार पेठ आणि पद्मश्री सोसायटी येथे शहरात नवे रुग्ण सापडले आहेत. 

 

शहरातील एक लाख 47 हजार 557 संशयितांमध्ये 11 हजार 474 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात चार लाख 38 हजार 95 संशयितांमध्ये 39 हजार 66 व्यक्‍ती कोरोना बाधित सापडल्या आहेत. आज (रविवारी) माणिक पेठ (ता. अक्‍कलकोट) 56 वर्षाचा पुरुष आणि घेरडी (ता. सांगोला) 89 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या सांगोल्यात 36, पंढरपुरात 100, बार्शीत 52, करमाळ्यात 59, माढा व माळशिरस तालुक्‍यात प्रत्येकी 74, मंगळवेढ्यात 28, मोहोळ तालुक्‍यात 25, उत्तर सोलापूर तालुक्‍यात पाच, दक्षिण सोलापुरात 11 व अक्‍कलकोट तालुक्‍यात 13 ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत. आज उत्तर सोलापुरात एकही रुग्ण आढळला नाही. दरम्यान, जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात दररोज तीन हजार संशयितांची टेस्ट करण्याचे उद्दिष्टे ठरवूनही त्यानुसार कार्यवाही झालेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 826 corona positive Active patient in Solapur City and district ! 103 new patients found today