कोरोना काळातही 85 वर्षीय आई ठणठणीत ! कोरोनाने शिकविला निरोगी राहण्याचा मूलमंत्र 

तात्या लांडगे
Monday, 4 January 2021

व्यायाम अन्‌ संतुलित आहार गरजेचा 
व्यायाम न करता, मनोरंजनाच्या साधनांद्वारे घरातच बसून आनंद घेणाऱ्यांना कोरोनाने निरोगी राहण्यासाठी काय करायला हवे, या गोष्टी शिकविल्या. त्यामुळे अशा महामारीच्या संकटातही अनेकजण कोरोनापासून चार हात लांबच राहिले आहेत. 
- डॉ. बिरूदेव दुधभाते, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका 

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून 24 मार्चपासून कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला. या काळात सर्वजण घरातच बसून होते. त्यावेळी निरोगी राहण्यासाठी व्यायाम करण्याची अनेकांना सवय लागली. घरातील ज्येष्ठ नागरिकाचे वय 70 हून अधिक असतानाही त्यांची तब्बेत ठणठणीत का राहिली, याचे गमक उलगडले. या पार्श्‍वभूमीवर दररोज दीड तास सायकलिंग, योगा करुन सकाळी नऊ वाजता जेवण करायची सवय लागली. त्यानुसार पुढील काळात दिनचर्या सुरु राहील, असा संकल्प केल्याचे महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. बिरूदेव दुधभाते यांनी सांगितले.

 

व्यायाम अन्‌ संतुलित आहार गरजेचा 
व्यायाम न करता, मनोरंजनाच्या साधनांद्वारे घरातच बसून आनंद घेणाऱ्यांना कोरोनाने निरोगी राहण्यासाठी काय करायला हवे, या गोष्टी शिकविल्या. त्यामुळे अशा महामारीच्या संकटातही अनेकजण कोरोनापासून चार हात लांबच राहिले आहेत. 
- डॉ. बिरूदेव दुधभाते, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका 

 

कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिक तथा को-मॉर्बिड रुग्णांनाच आहे. कोरोनामुळे अनेक को-मॉर्बिड रुग्णांचा मृत्यू झाला तर दुसरीकडे व्यायामाची सवय नसलेल्या तरुणांचाही त्यात समावेश आहे. माझ्या आईचे वय सध्या 80 वर्षे असूनही ती दररोज अर्धा तास व्यायाम करते. आईला अद्याप कोणताही आजार नसून तिची तब्बेत ठणठणीत आहे. आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांचे वय जास्त असतानाही ते निरोगी आहेत. त्यामागे व्यायाम आणि संतुलित आहार, वेळेवर आहार आणि पुरेशी झोप ही प्रमुख कारणे आहेत. कोरोना येण्यापूर्वी मला कामानिमित्त पुरेशी झोप मिळत नव्हती. बैठक तथा कामानिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर मिळेल ते खावे लागत असे. मात्र, आता मी नियमित व्यायाम, संतुलित आहार, दररोज आहारात फळे, हिरव्या भाज्यांचा वापर करु लागलो आहे, असेही डॉ. दुधभाते यांनी सांगितले. दिनचर्या बदला, परंतु निरोगी राहण्यास त्याचा उपयोग झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्‍त केली. 

या गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष 

  • ताप, खोकला, सर्दी कमी होत नसल्यास तज्ज्ञ डॉक्‍टरांचा घ्यावा सल्ला 
  • गर्दीत जाणे टाळा आणि अनावश्‍यक प्रवास कमी करावा 
  • उत्तम आरोग्यासाठी व्यायाम आणि संतुलित आहार घ्यावा 
  • तेलकट, मसालेदार, तिखट पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नका

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 85-year-old mother still healthy during Corona! Corona taught the mantra of staying healthy