बारा लाखांच्या शहरात 89 हजार टेस्ट ! आज 19 पॉझिटिव्ह अन्‌ तिघांचा मृत्यू  

तात्या लांडगे
Wednesday, 21 October 2020

ठळक बाबी... 

  • शहरात आतापर्यंत 88 हजार 783 कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात आढळले नऊ हजार 325 पॉझिटिव्ह 
  • शहरातील 348 पुरुष, 172 महिलांचा कोरोनाने घेतला बळी 
  • आतापर्यंत आठ हजार 210 रुग्णांनी केली कोरोनावर मात 
  • आज 376 संशयितांची टेस्ट; 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

सोलापूर : शहरातील लोकसंख्या सुमारे 12 लाखांपर्यंत असतानाही आतापर्यंत अवघ्या 88 हजार 783 संशयितांचीच कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. दररोज अडीचशे ते चारशेपर्यंत संशयितांची कोरोना टेस्ट केली जात आहे. आज शहरातील भवानी पेठेतील 52 वर्षीय अनोळखी पुरुषाचा, बसवेश्‍वर नगरातील 69 वर्षीय पुरुषाचा आणि गैबीपीर नगरातील 56 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 376 जणांच्या अहवालात 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

ठळक बाबी... 

  • शहरात आतापर्यंत 88 हजार 783 कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात आढळले नऊ हजार 325 पॉझिटिव्ह 
  • शहरातील 348 पुरुष, 172 महिलांचा कोरोनाने घेतला बळी 
  • आतापर्यंत आठ हजार 210 रुग्णांनी केली कोरोनावर मात 
  • आज 376 संशयितांची टेस्ट; 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

 

साबळे नागरी आरोग्य केंद्राजवळ, भवानी पेठ, आशा नगर (एमआयडीसी), सर्वोदय अपार्टमेंट, संकेत थोबडे नगर (वसंत विहार), स्वागत नगर (कुमठा नाका), गोंधळे वस्ती, अंत्रोळीकर नगर (भाग दोन), ओंकार हौसिंग सोसायटी (मजरेवाडी), निर्मिती विहार, गोंडे नगर, टिळक चौक (उत्तर कसबा), विजयालक्ष्मी नगर (नई जिंदगी), गंगाधर हौसिंग सोसायटी येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. शहरात सद्यस्थितीत रुग्णांच्या थेट संपर्कातील 90 संशयित होम क्‍वारंटाईन आहेत. तर 73 संशयित इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. शहरात घरोघरी जाऊन आता को-मॉर्बिड रुग्णांचा फेरसर्व्हे सुरु करण्यात आला आहे. 'कुटूंब माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत को- मॉर्बिड रुग्णांचे ऑक्‍सिजन व तापमान लेव्हल तपासणी केली जात आहे. मात्र, बहूतेक ठिकाणी सर्व्हे करणाऱ्यांना दिलेले ऑक्‍सिमिटर व थर्मामीटर बंद पडल्याच्या स्थितीत असल्याचेही काही शिक्षकांनी सांगितले. त्यामुळे त्यांना रिकाम्या पावलाने परतावे लागत असल्याचेही दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 88,783 tests in 12 lakh cities! Today 19 positive and three died