दुसऱ्या लाटेपूर्वी वितरीत होणार 60 हजार रेमडेसिवीर ! आतापर्यंत मिळाले 59 हजार इंजेक्‍शन

3Remdesivir (2).jpg
3Remdesivir (2).jpg
Updated on

सोलापूर : राज्यात डिसेंबरअखेर, जानेवारी व फेब्रुवारीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. तत्पूर्वी, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचनांनुसार जिल्हा प्रशासनाने सर्वोतोपरी तयारी करुन ठेवली आहे. दरम्यान, राज्यातील शासकीय रुग्णालयांसाठी सुमारे 60 हजार रेमडेसिवीर तर सोलापूर जिल्ह्यासाठी 950 इंजेक्‍शन मिळणार आहेत. तत्पूर्वी, सोलापूरचा मृत्यूदर राज्यात सर्वाधिक राहिल्याने सुरवातीला सोलापूरसाठी चार हजार 750 रेमडेसिवीर तर 35 टोसिलुझिमॅब इंजेक्‍शन सरकारी रुग्णालयांना मिळाले आहेत. आता 350 रेमडेसिवीर इंजेक्‍शन शिल्लक आहेत. 

किंमती झाल्या आता कमी
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सुरवातीच्या काळात रेमडेसिवीर इंजेक्‍शनची किंमत साडेपाच हजारांपर्यंत होती. त्यातच त्या इंजेक्‍शनचा मोठा तुटवडाही जाणवला. दुसरीकडे टोसिलुझिमॅब हे इंजेक्‍शन तब्बल 40 हजार रुपयास असून सोलापूरसाठी आतापर्यंत 35 इंजेक्‍शन मिळाली आहेत. महापालिकेसह श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, ग्रामीणमधील उपजिल्हा व तालुका ग्रामीण रुग्णालयांना हे इंजेक्‍शन वितरीत करण्यात आली आहेत. दरम्यान, रेमडेसिवीर या इंजेक्‍शनची किंमत आता दोन हजार 850 रुपयांना मिळू लागले असून त्याचा पुरेसा साठाही शिल्लक आहे.

कोरोनातून रुग्ण बरा व्हावा म्हणून सौम्य लक्षणे असलेल्यांना रेमडेसिवीर इंजेक्‍शन तर मृत्यूच्या दारातील रुग्णांना टोसिलुझिमॅब दिले जात आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना फॅबीपिराव्हीर गोळ्याही दिल्या जातात. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी राज्यात सर्वप्रथम कोरोना रुग्णांना या गोळ्या देण्यास सुरवात केली. आतापर्यंत राज्यभरात तब्बल 60 हजार रेमडेसिवीर वितरीत करण्यात आले असून त्यापैकी एकट्या सोलापूरसाठी चार हजार 750 इंजेक्‍शन मिळाले आहेत. दुसरीकडे सोलापूरसाठी एक लाख 51 लाख 300 फॅबीपिराव्हीर गोळ्या मिळाल्या असून त्यातील 71 हजार 740 गोळ्या रुग्णांना दिल्या आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयासह पंढरपूर, अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालये, करकंब, करमाळा, बार्शी व माळशिरस येथील ग्रामीण रुग्णालयांना रेमडेसिवीर इंजेक्‍शन दिली गेली आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातून व हाफकिनकडून आणखी रेमडेसिवीर मिळणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

इंजेक्‍शन कोणाकडून मिळाले...
आरोग्य मंत्री
38
राष्ट्रीय आरोग्य अभियान
750
जिल्हा नियोजन समिती
112
सार्वजनिक आरोग्य विभाग
100
हाफकीन
3,750

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers in Mohol taluka face a severe drought-like situation as rainfall remains inadequate, affecting crops, water availability, fodder and dairy production.
Mohol Police conduct a route march across the city and Shetphal ahead of Ganeshotsav to maintain law and order.
Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Marathi News Esakal
www.esakal.com