कोरोना : मॉर्निंग वॉकला गेलेल्या 82 जणांवर कारवाई

Action on 82 people who went to Morning Walk
Action on 82 people who went to Morning Walk
Updated on

सांगोला (सोलापूर) : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी देशात संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यात 144 कलम लागू असताना सांगोला शहरात मॉर्निंग वॉकला फिरणाऱ्या 82 जणांवर दोन गुन्हे दाखल करून कारवाई केल्याची माहिती सांगोल्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली आहे. 
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी शासन स्तरावर सर्व विभाग रात्रंदिवस काम करत आहेत. परंतु, काही नागरिक प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत नाहीत. सांगोला शहरातील महूद, चिंचोली, कडलास नाका, वाढेगाव, एखतपूर रस्त्यांवर पेट्रोलिंग करताना अनेकजण कोणतीही दक्षता न घेता, सोशल डिस्टसिंग न ठेवता मॉर्निंग वॉक करत होते. त्या 82 जणांवर सांगोला पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली. कोरोना विषाणू वेगाने पसरत असून संसर्ग होऊ याकरिता प्रशासन काळजी घेत आहे. परंतु, काही नागरिकांना गांभीर्य नाही. गांभीर्य नसलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Hundis Overflow as Devotees Offer ₹9.46 Crore to Lord Vitthal in Adhik Maas
IPS solapur SP Atul Kulkarni
 Tukaram Mundhe
civil hospital
Marathi News Esakal
www.esakal.com