
करमाळा (सोलापूर) : ढोकरी (ता. करमाळा) येथील उजनी जलाशय परिसरात भागवत पाटील यांच्या वस्तीजवळ अनधिकृतपणे वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या तीन यांत्रिक बोटींवर महसूल विभागाच्या पथकाने धाडसी कारवाई केली आहे. या ठिकाणी तीन बोटी व तीन सक्शन बोटी अनधिकृतपणे वाळू उपसा करताना दिसून आल्या. त्यांना वाळू उत्खनन करताना पकडण्यात आले. परंतु, त्यातील एक बोट अंधाराचा फायदा घेऊन पाण्यातून पळवून नेण्यात आली. या ठिकाणी 40 लाख रुपयांचा मुद्देमाल व संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत.
ही कारवाई तहसीलदार समीर माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकामध्ये निवासी नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, नायब तहसीलदार सुभाष बदे, मंडळ अधिकारी किरण खारव, रेवणनाथ वळेकर, तलाठी उमेश बनसोडे, मोहसीन हेड्डे, आनंदा डोणे, साईनाथ आडगटाळे, संजय शेटे, बाळासाहेब कांबळे, कोतवाल नितीन हत्तीकट, पोलिस पाटील अभिजित वळसे यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल महेश बचुटे यांचा समावेश होता.
पोलिसांनी कारवाईत झारखंड राज्यातील इमरान शेख, हानिफ शेख, नासीर शेख, कलू शेख या कामगारांना ताब्यात घेतले आहे. या बोटी विकास देवकर, तेजस सोनवणे, कुणाल खडके, गणेश लोंढे, बीजू साळुंके, गणेश इसगुडे (सर्व रा. इंदापूर) यांच्या असल्याचे या कामगारांनी सांगितले. सर्व कामगार व बोटी मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
उजनी जलाशय परिसरात होणारा अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी विविध पथके नेमली आहेत. ही पथके तालुक्यात सर्व ठिकाणी गस्त घालणार आहेत. वाळू चोरीत प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
- समीर माने,
तहसीलदार, करमाळा
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.