esakal | लुटीचे तंत्र वापरणाऱ्या खासगी डॉक्‍टरांवर होणार कारवाई : मंत्री बच्च कडू 

बोलून बातमी शोधा

Bachhu Kadu.jpg

कोरोनाचा कहर सुरू असताना सरकारने निवडणूक न घेणे हितावह होते. राज्य सरकारच्या अधिकारातील सर्व निवडणूक पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी प्रशासक लावण्यात आले आहे. मात्र, केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असतानाही निवडणूक जाहीर केली. अशा काळात निवडणूक घेण्याची गरज नव्हती असे त्यांनी सांगितले

लुटीचे तंत्र वापरणाऱ्या खासगी डॉक्‍टरांवर होणार कारवाई : मंत्री बच्च कडू 
sakal_logo
By
अरविंद मोटे

सोलापूर : सध्या कोरोनाचा कहर सुरू असतानाच काही खासगी डॉक्‍टरांकडून रुग्णांची लूट होत आहे, असे प्रकार निदर्शनास आले तर सरकार कठोर पावले उचलणार असून अशा डॉक्‍टरांवर कडक कारवाईचा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला. पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्रचारासाठी जात असताना सोलापूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा कहर सुरू आहे. येथून जवळच अगदी 150 किलोमीटर अंतरवरील हैदराबाद शहरात कोणोही मास्क वापरत नाही. बाजारात रस्त्यांवर प्रचंड गर्दी आहे. तरीही तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव नाही आणि सर्व नियमांचे पालन करणाऱ्या महाराष्ट्रात मात्र कोरोनाचा कहर झाल्याने त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. सध्या खासगी वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणत रुग्णांची लूटमार सुरू असून असे प्रकार निदर्शनास आल्यास त्यावर कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. 

कोरोनाचा कहर सुरू असताना सरकारने निवडणूक न घेणे हितावह होते. राज्य सरकारच्या अधिकारातील सर्व निवडणूक पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी प्रशासक लावण्यात आले आहे. मात्र, केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असतानाही निवडणूक जाहीर केली. अशा काळात निवडणूक घेण्याची गरज नव्हती असे त्यांनी सांगितले. 

कोरोनाच्या वाढत्या मृत्यूदाराबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली तसेच लॉकडाउन झाल्यास सर्वमसामन्यांचे हाल होतील असेही त्यांनी सांगितले. विडी कामगार, असंघटीत कामगार, ऊसतोड कामगार यांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवले जातील असेही त्यांनी सांगितले. 
भालकेच येणारे मताधिक्‍यासाठी प्रचार पंढरपूर मंगळवेढा निवडणुकीत काय होईल असा प्रश्‍न विचारला असता भगीरथ भालके हे निवडून येणार आहेत. आता प्रचार केवळ मताधिक्‍यासाठी करायचा आहे, असे त्यांनी सांगितले. 

संपादन : अरविंद मोटे