esakal | शहरात ऍक्‍टिव्ह रुग्ण 642 अन्‌ क्‍वारंटाईनमध्ये 177 संशयित ! आज 17 पॉझिटिव्ह; 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

HospiBuz_Covid-19-Breakthrough-compressor.jpg

ठळक बाबी... 

  • शहरातील 88 हजार 61 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत आढळले नऊ हजार 275 कोरोना पॉझिटिव्ह 
  • शहरातील 342 पुरुष आणि 172 महिला ठरल्या कोरोनाच्या बळी 
  • आज 258 संशयितांची कोरोना टेस्ट; 17 पॉझिटिव्ह अन्‌ एकाचा मृत्यू 
  • होम क्‍वारंटाईनमध्ये 93 संशयित तर इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये 84 संशयित 

शहरात ऍक्‍टिव्ह रुग्ण 642 अन्‌ क्‍वारंटाईनमध्ये 177 संशयित ! आज 17 पॉझिटिव्ह; 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील किमान पाच ते दहा व्यक्‍तींना क्‍वारंटाईन करण्याचे धोरण यापूर्वी निश्‍चित झाले होते. मात्र, शहरातील ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या सध्या 642 असतानाही सद्यस्थितीत होम आणि इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये एकूण 177 संशयित असल्याचे समोर आले आहे. आज शहरात 17 पॉझिटिव्ह सापडले असून भवानी पेठेतील 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

ठळक बाबी... 

  • शहरातील 88 हजार 61 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत आढळले नऊ हजार 275 कोरोना पॉझिटिव्ह 
  • शहरातील 342 पुरुष आणि 172 महिला ठरल्या कोरोनाच्या बळी 
  • आज 258 संशयितांची कोरोना टेस्ट; 17 पॉझिटिव्ह अन्‌ एकाचा मृत्यू 
  • होम क्‍वारंटाईनमध्ये 93 संशयित तर इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये 84 संशयित 

शहराची लोकसंख्या 12 लाखांपर्यंत असतानाही अद्याप शहरातील 90 हजार संशयितांचीदेखील कोरोना टेस्ट झालेली नाही. दररोज केलेल्या एकूण टेस्टमध्ये किमान 12 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत व्यक्‍ती पॉझिटिव्ह सापडत आहेत. आज देवनगर (सोरेगाव), आशिर्वाद नगर, वामन नगर (जुळे सोलापूर), धमश्री लाईन (मुरारजी पेठ), इंदिरा नगर (विजयपूर रोड), राघवेंद्र नगर (सैफूल), नेताजी सुभाष सोसायटी, नीला नगर (बुधवार पेठ), श्रीराम नगर (शाहीर वस्ती, भवानी पेठ), श्री अपार्टमेंट, सम्राट चौक (बुधवार पेठ), तेजस नगर (होटगी रोड), सुभाष नगर (मजरेवाडी), अवंती नगर (जुना पुना नाका) आणि रेल्वे लाईन या ठिकाणी नवे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत शहरातील आठ हजार 119 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आज 48 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.