बार्शी तालुक्‍यात नव्याने 130 कोरोनाबाधितांची भर 

प्रशांत काळे 
Monday, 28 September 2020

दोन दिवसांत बार्शी शहरातील 254 तर ग्रामीणमधील 73 असे 327 जण निगेटिव्ह आले आहेत. रविवारी शहरातील एक व ग्रामीणमधील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 41 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याचे खुळे यांनी सांगितले. 

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर व तालुक्‍यातील रविवार अन्‌ सोमवार अशा दोन दिवसांच्या प्राप्त झालेल्या 656 तपासणी अहवालामध्ये 130 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. शहरातील 81 तर ग्रामीणमधील 49 असे रुग्ण असून बाधितांची संख्या 4 हजार 572 झाली आहे. बरे होऊन 3 हजार 551 जण घरी गेले आहेत. 148 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती पालिकेचे उपमुख्याधिकारी जयसिंह खुळे यांनी दिली. 
शहरातील 334 व ग्रामीणमधील 122 असे 656 अहवाल प्राप्त झाले. शहरातील 466 व ग्रामीणमधील 216 असे 682 जणांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील 75 तर ग्रामीणमधील 73 अशा 148 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील 169 तर ग्रामीणमध्ये 22 अशा 191 जणांवर उपचार सुरु आहेत. शहरातील उपळाईरोड, कासारवाडी रोड प्रत्येकी 3,भवानी पेठ 6,कुर्डुवाडी रोड,देशमुख प्लॉट, सुभाष नगर,सोलापूर रोड,शिवशक्ती मैदान,जावळी प्लॉट, गणेश कॉलनी येथे प्रत्येकी एक जण तर अलिपूर रोड, पवार प्लॉट येथे प्रत्येकी दोन असे 23 जण सोमवारी तर रविवारी 58 जण असे 81 जण कोरोना बाधित आढळले आहेत. ग्रामीण भागातील वैराग चार, धोत्रे 7, सुर्डी, अरणगाव, जामगाव, काटेगाव, कासारवाडी येथे प्रत्येकी एक जण, असे सोमवारी 16 जण तर रविवारी 33 जण असे एकूण 49 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दोन दिवसांत शहरातील 254 तर ग्रामीणमधील 73 असे 327 जण निगेटिव्ह आले आहेत. रविवारी शहरातील एक व ग्रामीणमधील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 41 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याचे खुळे यांनी सांगितले. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Addition of 130 new corona victims in Barshi taluka