सोलापूर ग्रामीण मध्ये 173 नव्या कोरोना बाधितांची भर, तिघांचा मृत्यू 

corona
corona
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 2 हजार 677 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2 हजार 504 अहवाल निगेटिव्ह आले असून 173 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या अहवालात तीन जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. 116 जण एकाच दिवशी कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

कोरोना चाचणीचे 47 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 34 हजार 396 झाली आहे. ग्रामीण भागातील एक हजार 14 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 1 हजार 513 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

31 हजार 869 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. आजच्या अहवाला मध्ये मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये मोहोळ तालुक्‍यातील कोन्हेरी येथील 41 वर्षीय महिला, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील मनगोळी येथील 67 वर्षीय पुरुष, सांगोला येथील कमलापूर येथील 65 वर्षिय पुरुषाचा समावेश आहे. ग्रामीण भागातील 11 हजार 534 जणांना सध्या होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. 2 हजार 504 जण अद्यापही इन्स्टिट्युन्शनल क्वारंटाईनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Former MLA Rajan Patil — Driving the Ashti Lift Irrigation Project Phase 3 for 3,900 hectares of farmland
Historical Inscription of Meidev Raja Found at Tirth
Solapur Crime
solapur-pune
Marathi News Esakal
www.esakal.com