प्रशासन हतबल! ग्रामीणमध्ये कोरोना सुसाट; आज 258 पॉझिटिव्ह अन्‌ आठ मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 August 2020

ठळक बाबी... 

  • ग्रामीण भागात आज सापडले 258 कोरोना पॉझिटिव्ह 
  • मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, दक्षिण सोलापूरातील आठ रुग्णांचा मृत्यू 
  • 11 तालुक्‍यांमधील रुग्णसंख्या आता आठ हजार 380 झाली 
  • आतापर्यंत ग्रामीण भागातील 237 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी 
  • आतापर्यंत पाच हजार 266 रुग्णांची कोरोनावर मात; दोन हजार 877 रुग्णांवर उपचार 

सोलापूर : शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. दहा दिवसांची कडक संचारबंदी करुनही बार्शी, मोहोळ, अक्‍कलकोट, पंढरपुरातील कोरोनाचा प्रसार कमी झालेला नाही. आज 11 तालुक्‍यात 258 रुग्ण नव्याने आढळले असून त्यापैकी आठजणांचा मृत्यू झाला आहे. आता एकूण रुग्णसंख्या आठ हजार 380 झाली असून मृतांची संख्याही 237 वर पोहचली आहे. 

 

अक्‍कलकोटमधील बुधवार पेठ, दुधनी, किणी, कुरनूर, करमाळ्यातील चांदगुडे गल्ली, देवळाली, गुलसडी, जातेगाव, मेनरोड, रोशेवाडी, संभाजी नगर, तेली गल्ली, झरे, मंगळवेढ्यातील बोराळे, ब्रम्हपुरी, गोनेवाडी, कुंभार गल्ली, लक्ष्मी दहिवडी, मरवडे, शिरनांदगी, तळसंगी, मोहोळमधील कामती खु., नरखेड, वाफळे, बार्शीतील जामगाव आ., काटेगाव, कोरफळे, महागाव, शेलगाव, उत्तर सोलापुरातील बीबी दारफळ, मार्डी, माढ्यातील बेंबळे, भोसरे, कुंभेज, कुर्डू, कुर्डूवाडी, मोडनिंब, वरवडे येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. माळशिरस तालुक्‍यातील 61 फाटा, अकलूजमध्ये 21 रुग्ण, बागेचीवाडी, बोंडले, बोरगाव, कन्हेर, कुसमोड, लवंग, लोंढे-मोहितेवाडी, माळीनगर, मांडवे, नातेपुते, पिलीव, संग्राम नगर, तांबवे, तांदुळवाडी, पंढरपुरातील अनिल नगर, भक्‍तीमार्ग, भंडीशेगाव, बादुले चौक, चळे, जळोली, जुनी पेठ, कडबे गल्ली, कालिकादेवी चौक, करकंब, कासेगाव, करोळे, खर्डी, कोळी गल्ली, लक्ष्मी टाकळी, महापौर चाळ, मनिषा नगर, नेमतवाडी, मुंढेवाडी, पळशी, परदेशी नगर, सांगोला रोड, संत पेठ, स्टाफ क्‍वॉर्टर उपजिल्हा रुग्णालय, सुस्ते, उंबरेपागे, वाडीकुरोली, वाखरी, सांगोल्यातील जवळा, कडलास, महूद, मेथावडे, नाझरे, वाढेगाव, वाकीशेगाव, दक्षिण सोलापुरातील मनगोळीत आठ आणि विंचूर येथे दोन रुग्ण आढळले आहेत. 

'या' गावातील रुग्णांचा मृत्यू 
वाफळे (ता. मोहोळ) येथील 53 वर्षीय पुरुष, कामती खुर्द येथील 77 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर पंढरपुरातील संतपेठेतील 80 वर्षीय पुरुषाचा, शेगाव दुमाला येथील 67 वर्षीय पुरुषाचा, दक्षिण सोलापुरातील फताटेवाडी येथील 75 वर्षीय पुरुषाचा, तर मनगोळीतील 27 वर्षीय पुरुषाचा, बार्शी तालुक्‍यातील वैरागमधील 72 वर्षीय महिला, माळशिरस तालुक्‍यातील पिलीव येथील 63 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administration is weak Corona increas on Solapur rural; Today 258 positive and eight deaths