डॉक्‍टर नर्स नंतर कोरोनाच्या विळख्यात सोलापुरातील नगरसेवकही

 After Doctor Nurse, also a corporator from Solapur in Corona
After Doctor Nurse, also a corporator from Solapur in Corona
Updated on

सोलापूर ः सोलापुरातील तीन डॉक्‍टर आणि एका नर्सला कोरोनाची लागण झाली असल्याचे रविवारी समोर आले. त्यानंतर आज कोरोनाच्या विळख्यात सोलापुरातील एक नगरसेवक अडकले असल्याची माहिती समोर आली. कोरोना बाधित झालेले नगरसेवक हे भारतरत्न इंदिरानगर या परिसरात संपर्कात असल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजते. 

सोलापुरातील कोरोना बाधित व्यक्तीची संख्या 65 झाली असून आज नव्याने चार रुग्ण सापडले आहेत. हे चार कोरोना बाधित रुग्ण सोलापूर परिसरातील असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. दोन रुग्ण शास्त्रीनगर परिसरातील, एक रुग्ण सिव्हील हॉस्पिटल परिसरातील व एक रुग्ण न्यू तिर्हे गाव (फॉरेस्ट चांदणी चौक) येथील असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. 

सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार 171 व्यक्ती या होम क्वारंटाइनमध्ये आहेत. इन्स्टिट्यूशन क्वारंटाइनमध्ये 740 जण असून आयसोलेशन वॉर्डातील एक हजार 280 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी एक हजार 75 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून 205 जणांची रिपोर्ट प्रलंबित आहेत. प्राप्त झालेल्या एक हजार 75 रिपोर्ट मधील एक हजार 10 जण हे कोरोना निगेटिव्ह आहेत तर 65 जण हे पॉझिटिव्ह आहेत. सोलापुरातील पाच व्यक्तींचा यापूर्वीच मृत्यू झाला असून उर्वरित 60 जणांवर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात कोरोना चाचणीचे तेवीस रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यापैकी 19 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर चार रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. 

माढा तालुकाही चिंतेत 
सोलापूर शहराच्या विविध भागात थैमान घातले असतानाच ग्रामीण भागातील सांगोला तालुक्‍यातील घेरडी आणि मोहोळ तालुक्‍यातील पेनुर - पाटकुल या गावात कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. पेनूर पाटकुल परिसरातील महिला पंढरपुरातील ज्या दवाखान्यात उपचार घेत होती. त्या दवाखान्यात माढा तालुक्‍यातील तुळशी येथील एका वृद्ध महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तुळशी गावाकडे येताच त्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या सोळा जणांना अधिक तपासणीसाठी सोलापुरात आणण्यात आले आहे. या सोळा जणांचे अहवाल काय येतात याकडे माढा तालुका वासियांचे लक्ष लागले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers in Mohol taluka face a severe drought-like situation as rainfall remains inadequate, affecting crops, water availability, fodder and dairy production.
Mohol Police conduct a route march across the city and Shetphal ahead of Ganeshotsav to maintain law and order.
Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Marathi News Esakal
www.esakal.com