esakal | खुशखबर ! सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्‍स्प्रेस धावणार 1 मार्चपासून; आठवड्यातील पाच दिवस प्रवाशांच्या सेवेत
sakal

बोलून बातमी शोधा

Hutatma Express

तब्बल अकरा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर - पुणे - सोलापूर हुतात्मा एक्‍स्प्रेस सोमवार 1 मार्चपासून धावणार असल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली. 

खुशखबर ! सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्‍स्प्रेस धावणार 1 मार्चपासून; आठवड्यातील पाच दिवस प्रवाशांच्या सेवेत

sakal_logo
By
विजय थोरात

सोलापूर : तब्बल अकरा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर - पुणे - सोलापूर हुतात्मा एक्‍स्प्रेस सोमवार 1 मार्चपासून धावणार असल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली. मध्य रेल्वेने सोलापूर विभागातील प्रवाशांच्या मागणीनुसार आणि सुविधेसाठी ही गाडी सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 

1 मार्चपासून गाडी क्र. 01158-01157 सोलापूर - पुणे - सोलापूर सुपरफास्ट विशेष एक्‍स्प्रेस पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे. तब्बल अकरा महिन्यांनंतर सोलापूर - पुणे - सोलापूर हुतात्मा एक्‍स्प्रेस ट्रॅकवर येणार आहे. या गाडीचे सर्व कोचेस आरक्षित असणार आहेत. 

गाडी क्र. 01158 सोलापूर - पुणे - सोलापूर हुतात्मा सुपरफास्ट विशेष एक्‍स्प्रेस 1 मार्चपासून पुढील आदेश येईपर्यंत धावणार आहे. ही गाडी सोलापूर स्थानकावरून आठवड्यातून पाच दिवस (सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार) सकाळी 6.30 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक कुर्डुवाडी आगमन सकाळी 07.17, दौंड स्थानकावर आगमन सकाळी 09.08 आणि पुणे स्थानकावर सकाळी 10.30 वाजता पोचणार आहे. 

गाडी क्र. 01157 पुणे - सोलापूर सुपरफास्ट विशेष एक्‍स्प्रेस 1 मार्चपासून पुढील आदेश येईपर्यंत धावणार आहे. ही गाडी पुणे स्थानकावरून आठवड्यातून पाच दिवस (सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार) संध्याकाळी 06.10 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक दौंड आगमन रात्री 07.13, कुर्डुवाडी स्थानकावर आगमन रात्री 08.47 आणि सोलापूर स्थानकावर रात्री 10 वाजता पोचणार आहे. 

या गाडीस ब्रेकयान-2 + द्वितीय श्रेणी-13 + एसी चेअर कार-01- एकूण 16 कोचेस असणार आहेत. कोरोना संदर्भातील राज्य व केंद्र सरकारच्या सर्व नियमांचे पालन रेल्वे गाडीत व रेल्वे स्थानकांवर केले जाणार आहे. कोरोनाशी निगडित इतर सर्व खबरदारी देखील सुनिश्‍चित केल्या जातील. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल