लॉकडाउननंतर माळशिरस तालुक्‍यातील 80 पैकी 70 माध्यमिक शाळा झाल्या सुरू 

Akluj School
Akluj School
Updated on: 

अकलूज (सोलापूर) : कोरोना लॉकडाउननंतर माळशिरस तालुक्‍यातील माध्यमिक शाळा झाल्या सुरू झाल्या असून, तालुक्‍यातील एकूण 80 माध्यमिक शाळांपैकी सुमारे 70 शाळा सुरू झाल्या असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी दिली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांत प्रथम शाळा बंद करण्यात आल्या. यातील अनेक प्राथमिक शाळा कोरोना रुग्णांच्या विलगीकरणासाठी वापरल्या गेल्या होत्या. आता जवळजवळ नऊ महिन्यांनंतर विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होणार आहेत. कोरोनाचा धोका संपला नसल्याने कोरोनाबाबतचे मास्क लावणे व सामाजिक अंतर राखणे आदी सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. 

माळशिरस तालुक्‍यात इयत्ता नववी ते बारावीच्या एकूण 80 शाळा असून सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण सॅनिटायझेशन करून घेतल्या आहेत. तालुक्‍यातील 80 शाळांमधून 22 हजार 867 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना गर्दी टाळून सामाजिक अंतर पाळता यावे यासाठी ज्या - त्या शाळेतील उपलब्ध वर्गांच्या क्षमतेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. तालुक्‍यात एकूण 954 शिक्षक असून गणित, इंग्रजी, विज्ञान शिक्षकांची संख्या 577 आहे. यातील 491 शिक्षकांची आरटीपीसीआर तर 553 शिक्षकांची आरएटी टेस्ट घेण्यात आली असून, यातील फक्त 12 शिक्षकांची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. शासनाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांकडून संमतीपत्रे घेण्याचे काम चालू असून, सुमारे 3 हजार 930 पालकांनी संमतीपत्रे दिलेली आहेत. 

सर्व शाळांतून कोरोनाबाबतचे नियम बंधकारक असून मास्क लावणे व सामाजिक अंतर ठेवणे, शाळेच्या आवारात इतरत्र न फिरता विद्यालयाच्या बैठक व्यवस्थेनुसार नेमून दिलेल्या जागेवरच बसावे, हात धुण्याची सुविधा, स्वच्छतागृहे आदी ठिकाणी वावरताना सामाजिक अंतर राखणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिग करूनच शाळेत प्रवेश दिला जाईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Division Teachers Constituency
Drought Relief for Maharashtra Farmers Limited to Two Hectares as Officials Survey Crop Damage Across 265 Talukas
Global Recording of 'Chrysilla Volup' in Madha College Campus; Major Milestone in Biological Research
Maharashtra Drought Crisis Hits Pandharpur as Three Month Rain Break Threatens Rabi Season and Farmer Livelihoods
Marathi News Esakal
www.esakal.com