तीन वर्षे अभ्यास करत ज्योत्स्ना मुळीक एमपीएससीत यशस्वी 

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 21 जून 2020

ज्योत्स्ना मुळीक यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे घेतले. दहावीनंतर पॉलिटेक्‍निक करून जाणीवपूर्वक त्यांनी टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयात बीएला प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. इतिहास विषयातून बी. ए. केले. पदवी शिक्षणात सलग तीन वर्षे महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला

टेंभुर्णी(सोलापूर): येथील विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाची विद्यार्थिनी ज्योत्स्ना प्रकाश मुळीक यांची 2019 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 63 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन तहसीलदारपदी निवड झाली आहे. पदवी नंतर त्यांनी तीन वर्षे अभ्यास करत हे यश मिळवले. 

ज्योत्स्ना मुळीक यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे घेतले. दहावीनंतर पॉलिटेक्‍निक करून जाणीवपूर्वक त्यांनी टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयात बीएला प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. इतिहास विषयातून बी. ए. केले. पदवी शिक्षणात सलग तीन वर्षे महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला. अवघ्या तीन वर्षांच्या परिश्रमात हे यश संपादन केल्यामुळें त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, संस्थेचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे, आर्या पब्लिक स्कूलच्या मार्गदर्शक संचालिका प्रणिती शिंदे, विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र कदम, प्रा. रवींद्र कुनाळे, आर्या पब्लिक स्कूलच्या शिक्षिका सुहासिनी कुनाळे, महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख डॉ. राजेंद्र गायकवाड, प्रा. दिगंबर वाघमारे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी ज्योत्स्ना मुळीक यांचे अभिनंदन केले. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after three years study jyotsna mulik succed in MPSC exam