वीजबिल सवलतीसाठी अक्कलकोट भाजपचा एल्गार ! 

राजशेखर चौधरी 
Monday, 23 November 2020

महाविकास आघाडी सरकारने लॉकडाउनमधील भरमसाठ वीज बिलाबाबत जनतेला रास्त सवलत द्यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष अक्कलकोट तालुका यांच्या वतीने आज (सोमवारी) सकाळी अक्कलकोट येथे महावितरण कार्यालयासमोर वीज बिलाच्या होळीचे आंदोलन करण्यात आले. 

अक्कलकोट (सोलापूर) : महाविकास आघाडी सरकारने लॉकडाउनमधील भरमसाठ वीज बिलाबाबत जनतेला रास्त सवलत द्यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष अक्कलकोट तालुका यांच्या वतीने आज (सोमवारी) सकाळी अक्कलकोट येथे महावितरण कार्यालयासमोर वीज बिलाच्या होळीचे आंदोलन करण्यात आले. 

या वेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, अक्कलकोट तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, अक्कलकोट शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, प्रभाकर मजगे, अप्पासाहेब पाटील, राजेंद्र बंदीछोडे, खय्युम पिरजादे, गुंडप्पा पोमाजी, भीमाशंकर इंगळे, चंद्रकांत इंगळे, जयशेखर पाटील, राजशेखर मसुती, शिवशरण वाले, यशवंत धोंगडे, श्रीशैल नंदर्गी, परमेश्वर यादवाड, महेश हिडोंळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

या वेळी महाआघाडी सरकारच्या कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला; तसेच त्यांच्या धिक्‍काराच्या घोषणाही देण्यात आल्या. सध्या उद्‌भवलेल्या भीषण परिस्थितीचा सामना करणे सर्वसामान्य लोकांना कठीण जात आहे. यातून दिलासा मिळावा यासाठी शासनाने लक्ष घालून वीज बिलात सवलत द्यावी, अशी आग्रही मागणी करून, या वेळी झालेल्या घोषणेद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

या वेळी झालेल्या आंदोलनावेळी दयानंद बिडवे, रमेश कापसे, सुरेखा होळीकट्टी, बाळा शिंदे, कांतू धनशेट्टी, नागराज कुंभार, दयानंद बमनळी, प्रदीप पाटील, लक्ष्मण बुरुड, धोंडीप्पा बनसोडे, स्वामीनाथ घोडके, सैपन मुजावर, सुधीर मचाले, अविनाश पोतदार, छोटू पवार, विनोद मोरे, अंबण्णा कामनूरकर, अंबण्णा चौगुले, सोन्या बापू शिंदे, गेनसिद्ध पाटील, इरण्णा भरमशेट्टी, बसवराज हौदे, हणमंत कलशेट्टी, मोहसीन मुल्ला, विठ्ठल कत्ते, ऋषी लोणारी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, भाजप पदाधिकारी, आघाडी प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, भाजप कार्यकर्ते व युवा मोर्चाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An agitation was organized on behalf of Akkalkot BJP for electricity bill concession