Gram Panchayat Election : कोण माघार घेणार अन् कोण बिनविरोध येणार? 24 तासांत स्पष्ट होणार अक्कलकोटचे चित्र

In Akkalkot taluka, Monday is the last day to withdraw the Gram Panchayat election application
In Akkalkot taluka, Monday is the last day to withdraw the Gram Panchayat election application

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्यात होत असलेल्या ७२ ग्रामपंचायत निवडणुकीत ७०,५५३ पुरुष तर ६३,८७९ स्त्री असे एकूण १ लाख ३४ हजार ४३९ मतदार या ग्रामपंचायत निवडणुकीत भाग घेऊन आपले गाव कारभारी येत्या पाच वर्षांसाठी निवडणार आहेत. सोमवार (ता.४) जानेवारीला हा अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यात कोणकोणते गाव पूर्ण बिनविरोध होतील अथवा संबंधित गावातील कोणत्या प्रभागातील उमेदवार हे अविरोध निवडले गेले आहेत. याची अंतिम रूपरेषा स्पष्ट होणार आहे.

सोमवारी अर्ज माघारी घेण्याच्यानंतर अक्कलकोट तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची अधिक स्पष्टता मिळणार आहे. त्यानंतर गावातील लढतीचे नेमके चित्र समजणार आहे. सद्यस्थितीत निवडणूक होत असलेली ७२ गावातील प्रभाग संख्या, एकूण निवडले जाणारे सदस्य तसेच निवडणूक प्रक्रियेत भाग घेणारे मतदार हे पुढीलप्रमाणे आहेत.

एकूण ७२ गावांची नेमकी स्थिती

आळगे (३)९ (१५७१), गुड्डेवाडी (३) ७ (११९६), देवीकवठे (३) (८३४), शेगाव (३) ९(१७२६), चिंचोळी न.(३) (१२७७), अंदेवाडी बु.(३) ९(१६०८), अंदेवाडी खु. (३) ७ (५१०), हिळ्ळी (३),९ (१४५८), बबलाद (३) ९(२५०३), इब्राहिमपुर (३) ७ (१३४३), नागोरे (३) ९,(१५६१), बादोले बु.(४) ११(३११४), शिरशी (३) ७ (६३२), साफळे(३) ७ (१००६), भोसगे (३) ७ (११२४), संगोगी अ (३) ७ (८११), तोरणी (३) ७ (७८०), उडगी (३) ९ (२३००), बऱ्हाणपूर (३) ९ (२२८१), डोंबरजवळगे (३) ९ (१४१९), सिंदखेड(३) ७ (१०२३), हालहळ्ळी अ (३) ७ (७४१), भुरीकवठे (३) ९ (१७१२), खैराट (३) ७ (१५११), गोगाव (३) ७ (१३८४), बोरोटी बु. (३) ९ (१७४९), बोरोटी खु (३) ९ (१६०९), बागेहळ्ळी (३) ७ (१२८२), कर्जाळ (३) ९ (२०२२), चपळगाव वाडी (३) ७ (८३०), चपळगाव (५) १३ (४६९९), मोट्याळ(३) ७,(१२०२), बासलेगाव(३) ९ (१४०७), मातनहळ्ळी (३) ७,(८२२) निमगांव(३) ७ (७४८), नागनहळ्ळी(३) ९,(८२५) गळोरगी (३) ९ (१७२२), गौडगांव खु (३) ७ (४८६), मिरजगी(३) ९ (१२५५), बोरी उमरगे(३) ७,(९९७), चुंगी (३) ९, ७ (२४५०), काझीकणबस (३) ९,(२०२५), दोड्याळ (३) ९ (१२४५), हंजगी (३) ९ (२३९५), गौडगांव बु. (४) ११ (२८९७), कल्लहीप्परगे (३) ७ (६०३), तडवळ (४) ११(३२५४), मुंढेवाडी(३) ९ (१५२७), तोळणूर (४) ११(४६७७), हैद्रा (४) ११ (२८३२), गुरववाडी (३) ७ (१२७७), हंद्राळ (३) ७ (१०९८), जेऊर (६) १७ (७१८६), मराठवाडी (३) ७ (६५८), नागणसुर (६) १७ (७२८४), किणी (४) ११ (३५५८), किणीवाडी (३) ७ (११९१), कुरनुर (४) ११(३७१०), सुलेरजवळगे (४) ११(३०६७), कोर्सेगाव(३) ९ (१८८६), कुमठे (३) ७(७७०), मुगळी(३) ९ (२०७९), सिन्नुर(३) ९ (१७१८), चिंचोळी मै (३) ७ (५३६), सांगवी बु (३) ९ (२१२९), सांगवी खुर्द(३) ९ (१५७३), चिकेहळ्ळी (३) ९ (१५३८), बनजगोळ (३) ९ (१५४४), पितापूर (३) ९,(१७९५), हन्नूर (४) ११ (३०२३), वागदरी(५) १५ (५०६३), किरनळ्ळी (३) ७ (१२३१), असे एकूण चित्र आहे. अर्ज स्थिती व मंजूर स्थिती पाहता काही गावे व काही प्रभाग हे अविरोध होणार हे निश्चित आहे, पण त्याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केल्यानंतरच नेमकी अविरोध व लढत होण्याची परिस्थिती लक्षात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com