अक्‍कलकोटमध्ये काहींची इच्छापूर्ती तर काहींचा अपेक्षाभंग ! सरपंच आरक्षणाची काहींना अचानक लॉटरी 

Akt_Jallosh
Akt_Jallosh

अक्कलकोट (सोलापूर) : तालुक्‍यातील 117 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार के. अंकित यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. त्यामध्ये 18 जागा मागासवर्गीयांसाठी तर इतर मागास वर्गासाठी तर 32 जागा व इतर जागा सर्वसाधारणसाठी राखीव झाल्या. गावाच्या निवडणुकीत पुढे होऊन खर्च केलेल्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आपल्या गावाचे आरक्षण मनासारखे न झाल्याने हिरमोड झाला आहे. आता त्याला पर्याय म्हणून उपसरपंच पद घेऊन गावच्या कारभारात नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. याशिवाय काही पॅनेलच्या प्रमुखांनी पुढाकार घेऊन खर्च स्वतः केला आणि त्यांचे पॅनेल निवडून आले आणि आरक्षण देखील मनासारखे झाल्याने आपण स्वतः किंवा जवळची व्यक्ती वा नातेवाईक सरपंच होण्याचे नक्की झाल्याने गुलाल उधळून आनंद व्यक्त करण्यात आला. 

अक्कलकोट तालुक्‍यातील आरक्षण पुढीलप्रमाणे... 

  • अनुसूचित जाती : साफळे, कल्लप्पावाडी, चिंचोळी, कुमठे, संगोगी (अ), सिन्नूर, अरळी 
  • अनुसूचित जाती स्त्री : गौडगाव बु., जेऊर, बबलाद / परमानंदनगर, आंदेवाडी ज., कंठेहळी, बोरगाव दे, बोरोटी खु., समर्थनगर 
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग : जकापूर, हत्तीकणबस, कोन्हाळी, गुड्डेवाडी, आळगे, म्हैसलगे, तडवळ, हन्नूर, मोट्याळ - बसवगीर, सुलेरजवळगे, करजगी, बादोले खु., मातनहळ्ळी, पितापूर, किणीवाडी, आंदेवाडी (खु.) 
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री : संगोगी (ब), उमरगे, कर्जाळ, ब्यागेहळ्ळी, मुंढेवाडी, जेऊरवाडी, शिरवळ, बोरेगाव, धारसंग, हंद्राळ / जैनापूर, नागणसूर, हैद्रा, इब्राहिमपूर, मराठवाडी, मिरजगी, उडगी 
  • सर्वसाधारण : सातनदुधनी, मुगळी, भोसगे, बासलेगाव, रुद्देवाडी, डोंबरजवळगे, देवीकवठे, काझीकणबस, चपळगाव, दर्शनाळ, खानापूर, दहिटणे, हालहळ्ळी (अ), केगाव बु., वागदरी, घोळसगाव, चुंगी, हालचिंचोळी, बिंजगेर, शावळ, नाविंदगी, गळोरगी, आंदेवाडी बु., कुरनूर, हिळ्ळी, सिंदखेड, शिरवळवाडी, निमगाव, नागनहळ्ळी, रामपूर इटगे, बोरोटी बु., पालापूर, बणजगोळ 
  • सर्वसाधारण महिला : बादोले बु., चुंगरेगाव, सलगर, चिक्केहळ्ळी, सांगवी बु / हिंगणी / कोळेकरवाडी, तळेवाड, दोड्याळ, सुलतानपूर, शेगाव, दहिटणेवाडी, किरनळ्ळी, चिंचोळी मैं., तोळणूर, खैराट, किणी, गुरववाडी, कडबगाव सेवालालनगर, गोडगाव खु., कोर्सेगाव, नागोरे, नन्हेगाव, गोगाव, वसंतराव नाईक नगर, केगाव (खु), भुरीकवठे, मंगरुळ, हंजगी, कल्लकर्जाळ, कुडल, चपळगाववाडी, सदलापूर, हसापूर, बऱ्हाणपूर, तोरणी 
  • अनुसूचित जमाती : कल्लहिप्परगे 
  • अनुसूचित जमाती स्त्री राखीव : अंकलगे, सांगवी खु./ ममदाबाद / कोळीबेट 

सरपंच आरक्षण जाहीर झाले आहे पण ज्यांचे पॅनेल निवडून आले आणि जे अगोदर खर्च केले आणि निवडणूक काळात त्यांच्यात पॅनेल आले तर सरपंच कोण होणार, याची खात्री अगोदरच केली होती. त्यांचे समर्थक व ते स्वतः जल्लोष करताना दिसले. सोशल मीडियावर "आमच्या गावाच्या सरपंचपदी विराजमान झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन' असे पोस्ट व्हायरल होत होते. खरे तर फक्त आरक्षण निघाले तसेच सरपंच निवडणूक नंतर घेतली जाणार आहे, पण हौसेला आणि निष्ठेला मात्र मोल नाही, हेही तितकेच खरे आहे. 

या वेळी अक्कलकोट तालुक्‍यातील 72 गावांची निवडणूक झाली आहे, मात्र आरक्षण 117 गावांचे काढले गेले. आमच्या गावाचे आरक्षण निवडणुकीनंतर तर येत्या काळात होणाऱ्या निवडणुकीचे आरक्षण आतच काढले गेले. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे. निवडणूक आयोग सूचना जरी दिली असली तरी यात दोन भिन्न गोष्टी केल्या गेल्याने अडचण निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 
- राजकुमार लकाबशेट्टी, बबलाद 

एकूण आरक्षण 117 ग्रामपंचायत 

  • अनुसूचित जाती : पुरुष (8), स्त्री (7) 
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग : पुरुष (16), स्त्री (16) 
  • सर्वसाधारण : पुरुष (33), स्त्री (34) 
  • अनुसूचित जमाती : पुरुष (1), स्त्री (2) 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com