अक्कलकोटला आज पुन्हा सहा कोरोनाबधित रुग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या पोचली ६२ वर

0Corona_Virus_.jpg
0Corona_Virus_.jpg

अक्कलकोट (सोलापूर): अक्कलकोट तालुक्याला सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांची मोठ्या संख्येने भर पडली असून आज शनिवारी नव्याने सहा रुग्ण आढळले असून आता तालुक्याची एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या ६२ वर पोचल्याची माहिती तहसिलदार अंजली मरोड यांनी दिली आहे.बुधवारी घेण्यात आलेल्या स्वॅबची एकूण संख्या पेंडिंगसह १२६ होती त्यापैकी शनिवारी सकाळी नऊ  वाजता मिळालेल्या माहितीनुसार त्याचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.
पॉझीटिव्ह रुग्ण एकूण : १३ (शुक्रवार ७ व शनिवार ०६),
निगेटीव्ह अहवाल ( १००)
प्रलंबित  अहवाल  (०७)
स्वॅब रद्द  अहवाल (०६) अशी राहिली आहे.

आज आढळलेल्या रुग्णांत सलगर दोन, समर्थनगर एक, बुधवार पेठ एक,इंदिरा नगर झोपडपट्टी, आझाद नगर एक असे एकूण सहा कोरोनाबधित रुग्ण आढळले आहेत.यामुळे आता नागरिकांत मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जात असून भीतीचे वातावरण पसरले आहे.आणि ही कोरोना स्थिती आटोक्यात कशी आणि केंव्हा येणार याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.केंद्र व राज्य सरकारने कोरोना रुग्ण संख्या वाढू नये यासाठी जी काही मार्गदर्शक तत्वे नागरिक व व्यापारी वर्ग यांच्यासाठी आखून दिली  होती.त्याची या दोघांकडूनही सर्रास बेदखल केले गेल्यानेच ही परिस्थिती उद्धभवली आहे हे मात्र नक्की आहे.

पोलीस प्रशासन व नगरपरषीद प्रशासन लॉकडाऊन काळात नागरिकांचे प्रबोधन करुन जाणीव व जागृती निर्माण केले असूनही काही जण रस्त्यावर फिरायचे काही सोडेनासे झाले आहेत त्यामुळे ते सुद्धा हळूहळू दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र शहर व ग्रामीण भागात दिसत आहे.आपल्या गावात किंवा आपल्या शेजारी रुग्ण आढळतो आहे तरीही गांभीर्य मात्र काहीच नाही.आता अक्कलकोटला कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनास एकदम कडक भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नाही.आता अक्कलकोटला पूर्वीचे प्रलंबित ०७ तर काल शुक्रवारी घेतलेले ५३ अशा एकूण ६० स्वॅबच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

दृष्टीक्षेपात अक्कलकोट कोरोनाची स्थिती
२७ जून २०२०

एकूण कोरोनाबधित रुग्ण संख्या : ६२
एकूण मृत रुग्ण संख्या : ०४
एकूण बरे होऊन आलेले रुग्ण संख्या : १२
एकूण उपचार सुरू असलेले रुग्ण संख्या : ४६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com