नगरपंचायतीसाठी वैरागकर एकवटले ! उमेदवारी अर्ज न भरण्याचा सर्वपक्षीय बैठकीत निर्णय 

Vairag NP
Vairag NP
Updated on

वैराग (सोलापूर) : शासनाने वैराग नगरपंचायतीची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आता वैरागकरांनी एकजुटीचा निर्णय घेतला आहे. जोपर्यत नगरपंचायत होत नाही, तोपर्यंत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत झाला. 

रविवारी ग्रामदैवत श्री संतनाथ महाराज मंदिरात सर्व राजकीय पक्षप्रमुख, तरुण, कार्यकर्ते, मतदार, व्यापारी व मान्यवरांची बैठक झाली. त्या वेळी अनेकांनी आपली मते मांडली. वैराग ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुकीसाठी एका गटास मोठा खर्च करावा लागतो. तीन महिने जरी शासनाने प्रशासकीय अधिकारी नेमला तरीही चालेल, मात्र नगरपंचायत होत नाही तोपर्यंत प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी उमेदवारी अर्ज भरायचा नाही. ज्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले ते सर्व पक्षांकडून अंतिम दिवशी काढून घेण्याची विनंती करीत मागे घेण्यास भाग पाडायचे. अर्ज दाखल नसल्याने निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलावी लागणार आहे. दरम्यान, नगरपंचायतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. नगरपंचायतीशिवाय वैरागचा विकास नाही. तर वैराग तालुका निर्मितीशिवाय वैराग भागाचा विकास नाही. आता सर्वांनी एकजूट करीत लढा उभा करून वैराग नगरपंचायत, वैराग तालुकानिर्मिती व या भागास उजनीचे पाणी या मागण्यांसाठी माघार न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 

बैठकीस निरंजन भूमकर, मकरंद निंबाळकर, संतोष निंबाळकर, तेजस्विनी मरोड, कल्पना बडेकर, संजय गावसाने, अरुण सावंत, नंदकुमार रणशूर महाराज, मोहन घोडके, राजेंद्र खेंदाड, आयुब पठाण, सलीम शेख, पटेल, मौलाना आब्बास कादरी, सुहास बंड, दलित मित्र प्रशांत भालशंकर, अनिल सावंत, दिलीप खेंदाड, हमीद चौधरी, राजकुमार पौळ, आदींसह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com